भुसावळ : प्रतिनिधी
येथील शब्बीर तडवी या २४ वर्षीय सुपरवायझरला मारहाण केल्याची घटना १४ रोजी रात्री १० वाजता घडली असून याबाबत ३० जानेवारीला वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील शब्बीर तडवी हा विकी चाहेल व बाळू इंगळे यांच्या राखेच्या बंडावर काम करतो. तो २४ रोजी कर्तव्यावर असताना करण बेलदार व नितीन बेलदार (रा. विल्हाळे) यांनी तुझ्या मालकाला बोलाव, अशी धमकी देऊन त्याला मानेवर लोखंडी रॉडने मारले. तसेच शिविगाळ व मारहाण करून गंभीर जखमी केले. शब्बीर हा पोलीस ठाण्यात आला असता त्यास मेडिकल मेमो देण्यात आला होता. त्यानंतर त्याने जळगाव येथे उपचार घेतले आहेत. तीन दिवसानंतर शब्बीर तडवी आल्यानंतर वरणगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, विल्हाळे येथील राखेच्या बंडावर असे वेगवेगळे प्रकरण घडत असून कुणाच्यातरी आशीर्वादाने ही प्रकरण घडत असल्याची चर्चा परिसरात आहे. तर गुन्हा दाखल करण्यास विलंबाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी ही होत आहे. चार तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर वरणगाव पोलीस ठाण्यात त्यांची तक्रार घेण्यात आली. याचा अर्थ कुणाच्या दबावाखाली हे कार्य होत आहे, याबाबत चौकशी करुन त्यावर आळा बसावावा, अशी मागणी होत आहे.



