कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील भाविक देशातील प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी करीत असतांना नुकतेच आता कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच आवश्यक भासल्यास नियंत्रण कक्षाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाशीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर ठिकाणी मोठ्या […]
राजीनामा नाट्यावर माजी मंत्री भुजबळ यांचे मोठे वक्तव्य !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी विरोधक महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत असतांना आता अजित पवार गटाचे नेते आ.छगन भुजबळ यांनी एक जुनी आठवण सांगितल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरण कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. या प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना राजीनामा […]
राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ : उपमुख्यमंत्री शिंदे देणार महाविकास आघाडीला मोठा धक्का !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीमध्ये असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेत निवडणुकीनंतर देखील मोठे पक्ष प्रवेश सुरु असतांना आता पुन्हा एकदा कॉंग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. नुकतेच काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि हुसैन दलवाई यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात […]
रेल्वेतून लाखो रुपयांचा गांजा जप्त !

भुसावळ : प्रतिनिधी पुरीहून अहमदाबादकडे निघालेल्या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाला बेवारस बॅगेत तब्बल १ लाख रुपयांचा १० किलो गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री समोर आल्यानंतर पुन्हा गांजा तस्करी ऐरणीवर आली आहे. या प्रकरणात अज्ञात प्रवाशाविरोधात लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता गांजा तस्कराला शोधण्यास सुरूवात केली आहे. सविस्तर वृत्त […]
शुल्लक कारणाने तिघांनी केली तरुणाला बेदम मारहाण

जळगाव : प्रतिनिधी कचरा उचलण्यास सांगितल्याचा राग आल्याने सुनिल मदन परदेशी (वय २५, रा. कंडारी, ता. जळगाव) यांना तिघांनी लाकडी बांबू डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कंडारी येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कंडारी येथे सुनिल मदन […]
दुचाकीच्या चाकात साडी अडकली अन महिलेचा दुर्देवी मृत्यू

जामनेर : प्रतिनिधी सिल्लोड येथे प्लॉटच्या कामासाठी दुचाकीवरून जाताना दुचाकीच्या चाकात साडी अडकल्याने झालेल्या अपघातात पहुर येथील ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दि.३० रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा कैलास चौधरी या त्यांचा मुलगा ऋषी चौधरी याच्यासोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे प्लॉटच्या कामासाठी जात होत्या. छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील सिल्लोड शहराजवळ दुचाकीच्या मागील चाकात […]
एकाच्या घरातून साडे सहा लाख चोरीला

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वावडे येथील एकाच्या घरातून साडे सहा लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना २८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वावडे येथील संजय राजधर पाटील (वय ५२) हे २३ रोजी शालकाची प्रकृती खराब असल्याने त्याला भेटायला सुरत येथे गेले होते. जाताना त्यांनी घराची चाबी गावातील ओळखीच्या […]
सुपरवायझरला जबर मारहाण : पोलिसात गुन्हा दाखल !

भुसावळ : प्रतिनिधी येथील शब्बीर तडवी या २४ वर्षीय सुपरवायझरला मारहाण केल्याची घटना १४ रोजी रात्री १० वाजता घडली असून याबाबत ३० जानेवारीला वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील शब्बीर तडवी हा विकी चाहेल व बाळू इंगळे यांच्या राखेच्या बंडावर काम करतो. तो २४ रोजी कर्तव्यावर असताना करण बेलदार […]