Home » गुन्हे » बस प्रवासात दागिने लांबविणारी महिला अटकेत !

बस प्रवासात दागिने लांबविणारी महिला अटकेत !

रावेर : प्रतिनिधी

पिंप्रीनांदू ते रावेर दरम्यानच्या एसटी बस प्रवासात दागिने व मोबाइल असा ५० हजार रु.चा मुद्देमाल असलेली पर्स लांबविणाऱ्या एका महिलेस रावेर पोलिसांनी २४ तासांत गजाआड केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नरेंद्र हरी तायडे (रा. गांधी चौक, रावेर) यांची बहीण मुक्ताईनगर रावेर या एसटी बसने प्रवास करून रावेर बसस्थानकावर उतरल्या असता तिच्याजवळील पर्स कुणीतरी चोरट्यांनी लांबवल्याची बाब उघड झाले होते. याप्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल व सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुप्त माहिती व सीसीटीव्हीच्या मदतीने संशयित महिलेला २४ तासांत गजाआड केले. तिने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिच्याकडून ४२ हजार रुपये किमतीचे दागिने व मोबाइल जप्त करण्यात आला आहे. रावेर न्यायालयात हजर केले असता तिला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून जळगाव उपकारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस नाईक कल्पेश आमोदकर, पो. कॉ. सचिन घुगे, पो. कॉ. विशाल पाटील, पो. कॉ. प्रमोद पाटील, पो. कॉ. महेश मोगरे, पो. कॉ. श्रीकांत चव्हाण, पो. ना. संभाजी बिजागरे या पथकाने ही कामगिरी केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *