Home » जळगाव » नफ्याचे आमिष दाखवित महिलेची ऑनलाइन फसवणूक !

नफ्याचे आमिष दाखवित महिलेची ऑनलाइन फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी

शेअर मार्केटमध्ये नफा झाल्याचे भासवून नंतर अधिकची गुंतवणूक करण्यास सांगत स्मिता अतुल महाजन (४३, रा. चहार्डी, ता. चोपडा) या महिलेची आठ लाख ९३ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १७ ऑक्टोबर २०२४ ते ९ जून २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील स्मिता महाजन यांच्याशी मोहित शर्मा, आशिष भारद्वाज नामक व्यक्तींनी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास सांगितले. महिलेने सुरुवातीला काही गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांना दोन ते अडीच लाख रुपयांचा नफा झाल्याचे ऑनलाइन दिसत होते. सुरुवातीला नफा झाल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला व अधिकची गुंतवणूक करण्यात सांगितले. त्यानुसार सदर महिलेकडून वेळोवेळी यूपीआय आयडीद्वारे, बँक खाते व बारकोडद्वारे रक्कम स्वीकारली.

सदर महिलेने स्वतःच्या खात्यासह कुटुंबातील इतर सदस्यांच्या खात्यावरूनदेखील रक्कम पाठविली. मात्र त्यांना नफा मिळणे तर दूरच मुद्दल रक्कमही मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी स्मिता महाजन यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *