Home » जळगाव » तहसीलदार बनविण्याचे आमिष महिलेची लाखो रुपयात फसवणूक !

तहसीलदार बनविण्याचे आमिष महिलेची लाखो रुपयात फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी

मुलीला तहसीलदार बनविण्याचे अमिष दाखवित कल्पना आत्माराम कोळी (वय ५३, रा. नेहरुनगर, मोहाडी रोड) यांच्याकडून ज्योती अशोक साळुंखे (रा. मणियार वाडा, बालाजी मंदिराजवळ) या महिलेने ४ लाख २२ हजार रुपये रोख, ३ लाख रुपयांचे ११० ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने आणि विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरुन जमा झालेले ३ लाख ५१ हजार ९५० रुपयो असे एकूण १० लाख ७५ हजार ९५० रुपये घेवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मोहाडी रोड परिसरात कल्पना आत्माराम कोळी यांची मुलगी वैशाली कोळी या खंडेराव नगरात वास्तव्यास आहे. हळदी कुंकुच्या कार्यक्रमामध्ये त्यांची ज्योती अशोक साळुंखे या महिलेशी ओळख झाली होती. त्या महिलेने कल्पना कोळी यांना माझी शासकीय कार्यालयात खूप ओळख असून तुमच्या मुलगा किंवा मुलीला शासकीय नोकरीला लावून देवू शकते असे सांगतले. त्याकरीता त्या महिलेने तिच्या मोबाईलवरुन काही लोकांची बोलणे करुन दिले होते.

नोकरीला लावण्यासाठी आपल्याला काही पैसे द्यावे लागतील असे देखील त्या महिलेने सांगितले होते. तहसीलदार बनविण्यासाठी ज्योती साळुंखे ही कल्पना कोळी यांना भेटून त्यांना आपल्याला २५ ते ३० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला ३० हजार रुपये घेतले होते. अजून थोडे पैसे लागतील असे म्हणत ज्योती साळुंखे हीने कल्पना कोळी यांच्याकडून दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी पासून ते दि. ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ४ लाख २२ हजार रुपये उकळले होते.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *