भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील वरणगाव शिवारातील गट नंबर ७८३ मधील शेतातील विहिरीत पडल्याने येथील भंगाळे वाडा येथील रहिवासी योगीता धीरज भंगाळे (वय ३५) यांचा गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. ही विहीर शेतकरी संजय तुळशीराम झांबरे यांच्या मालकीची असून अपघात कसा घडला, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
ही मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले. त्यानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढून, शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मयत योगीता भंगाळे यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भंगाळे वाडा तसेच त्यांचे माहेर असलेल्या काहुरखेडा गावात शोककळा पसरली आहे. वरणगाव पोलिसांत आकसमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो. कॉ. श्रावण जवरे करत आहेत.
