Home » जळगाव » भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू !

भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू !

चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरातील हिरापूर रोडवरील काल रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर या परिसरातील संतप्त नागरिकांनी या मार्गावर गतीरोधक तयार करणे व नियमीत पथदिवे सुरु ठेवण्याची मागणी करत रास्तारोको आंदोलन केले होते.

सविस्तर वृत्त असे कि, हिरापूर रोडवरील तालुका कृषी कार्यालयासमोर काल रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास एका अद्यात वाहनाने पादचारी वृद्ध पुष्पाबाई पीतांबर ठाकूर (वय ७४, रा. ठाकूरवाडी) यांना धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. तर उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले. दरम्यान, ५ जुलैला ठाकूरवाडी, हिरापूर रोडवर बसून संतप्त नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले.

या वेळी ठाकूरवाडी परिसरात गतीरोधक बसवण्याची आंदोलकांनी मागणी केली. तसेच या भागात पथदिवे सुरु करावेत, अशी मागणी ही रास्तारोको करणाऱ्या नागरिकांनी केली. या वेळी शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. अमितकुमार मनेळ व पो.उ.नि. संदिप घुले व पो.कॉ. योगेश बेलदार, नितीन आगोने व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मयत पुष्पाबाई ठाकूर यांच्या पश्चात पती, मुलगा, २ मुली असा परिवार आहे. त्या ज्ञानेश्वर विद्यालयातील मुख्याध्यापिका सुनीता देवरे यांच्या मातोश्री तर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ठाकूर यांच्या आजी होत. पुष्पाबाई ठाकूर यांच्या अपघाती निधनामुळे परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्याची माहिती प्रशांत ठाकूर यांनी दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *