Home » राजकारण » महावितरणच्या कर्मचाऱ्यांना महिलांनी केली मारहाण !

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना महिलांनी केली मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

वीजपुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीसाठी गेलेले महावितरणचे तंत्रज्ञ सुदर्शन तुकाराम सपकाळे व दीपक नंदलाल बडगुजर या दोघांवर चार महिलांनी हल्ला करीत मारहाण केली. ही घटना शनिवारी दि. १४ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता शिवाजीनगरमधील उमर कॉलनी भागात घडली. या घटनेमुळे महावितरणचे कर्मचारी संतप्त झाले असून शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगर परिसरातील उमर कॉलनीतील विद्युत पुरवठा शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास खंडित झाला होता. त्या वेळी शिवाजीनगर हुडको वीज उपकेंद्रातील तंत्रज्ञ सुदर्शन सपकाळे व दीपक बडगुजर हे दुरुस्तीसाठी तेथे गेले. त्या वेळी चार अनोळखी महिलांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला केला. यात दीपक बडगुजर यांना एका महिलेच्या बांगडीचा काच लागून चेहऱ्याला दुखापत झाली. या घटनेनंतर महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ संघटनेच्यावतीने निषेध करण्यात येऊन कारवाईची मागणी करण्यात आली. या वेळी दीपक सपकाळे, दिनेश सपकाळे, वंदना वानखेडे यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते. सुदर्शन सपकाळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार अनोळखी महिलांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *