Home » जळगाव » विहिरीत महिलेला ढकलून तरुण फरार !

विहिरीत महिलेला ढकलून तरुण फरार !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील चुंचाळे या गावाजवळ शेत विहिरीत ३२ वर्षीय महिलस एका तरुणाने विहिरीत ढकलून तो तेथून फरार झाला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. महिलेला विहिरीतून काढून यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले व महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चुंचाळे ता. यावल या गावाच्या शेतशिवारात प्रकाश जैन यांचे शेत आहे. या शेतातील विहिरीत उमा रविकांत चमखाने (वय ३२) रा. मोठा बालाजी मंदिर माजनपेठ बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश ही महिला सलमान पठाण रा. पातोंडा ता. लालबाग याच्यासोबत रविवारी मनुदेवी दर्शना करीता आली होती व दुपारी १ वाजेला ते शेतात नाश्ता करत होते. दरम्यान नाश्ता झाल्यानंतर या तरुणाने महिलेला विहिरीत किती खोल पाणी आहे बघं असे सांगीतले व महिला विहिरीत डोकावत असतांना तिला तरूणाने विहिरीत ढकलून दिले आणि तेथून तो फरार झाला. दरम्यान सोमवारी सकाळी या महिलेचा आवाज विहिरीतून ऐकल्यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोहसीन खान हे पथकासह दाखल झाले.

महिलेला विहिरीतून काढण्यात आले. महिलेचा एक हात आणि एक पाय फ्रेंक्र आहे. त्याच्यावर यावल ग्रामिण रूग्णालयात प्रथम उपचार करून जळगाव हलवण्यात आले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून सलमान पठाण यांच्या युद्ध गुन्हा दाखल करून आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *