Home » जळगाव » जून्या वादातून तरुणाला धारदार वस्तूने मारहाण !

जून्या वादातून तरुणाला धारदार वस्तूने मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

जून्या वादातून संशयित रिहान मेहमुद शेख (रा. तांबापूरा, मच्छीबाजार) याने दोघांवर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना दि. २३ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तांबापूरातील मच्छीबाजार परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापूरा परिसरातील टिपू सुलतान चौकात साहील शहा सद्दाम शहा (वय १८) हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २३ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तांबापुरा परिसरातील जुम्मा शहा यांच्या वखारीजवळ रिहान मेहमुद शेख याने रिहान चंदू पिंजारी याच्या हातावर तर साहील शहा सद्दाम शहा यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करुन जखमी केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साहील शहा याने एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार रिहान मेहमूद शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल – करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ रामदास कुंभार करीत आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *