Home » ताज्या » पाय घसरून पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पाय घसरून पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पारोळा : प्रतिनिधी

पाटाच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी गेलेला ३८ वर्षीय तरुणाच्या पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील मोहाडी येथील सुनील अनिल भील (वय ३८) असे मृत तरुणााचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भोकरबारी धरणाला लागून असलेल्या पाटाचा पाण्यात रविवारी सुनील भील हे मासे पकडण्यासाठी गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास मासे पकडताना सुनील भील यांचा अचानक पाय घसरून ते खोल पाण्यामध्ये पडले. त्यांना राजू भील, भीमा ठाकरे व विकास मोरे यांनी बाहेर काढून रुग्णवाहिकेतून बेशुद्ध अवस्थेत पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत राजू रामसिंग भील यांच्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *