Home » जळगाव » वीज तारांच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

वीज तारांच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील चौगुले प्लॉट येथील रेल्वे लाइनजवळ महावितरणच्या विजेच्या तारांच्या धक्क्याने लागल्याने २१ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. यासंदर्भात शनी पेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे कि, योगेश रघुनाथ डोंगर (वय २१, रा. गवळीवाडा) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. गवळी वाडा या परिसरात योगेश हा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होता. बांधकामाचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत होता. चौगुले प्लॉटजवळील लेंडी नाल्याजवळून जात असताना रेल्वे लाइनच्या कच्च्या रस्त्यावर असलेल्या महावितरणच्या खांबावरील तुटलेल्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर शनी पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यासंदर्भात शनी पेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन लहान बहिणी, असा परिवार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *