पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील गजबजलेल्या बस स्थानक परिसरात आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका २६ वर्षीय तरूणाचर दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी गावठी कडूयाचे १२ राउंड फायर केले. या घटनेत जखमी झालेल्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मारेकरी सुसाट वेगाने घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी सांगितली. दरम्यान, ही माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. योगेश गणगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी नगरमधील आकाश कैलास मोरे (वय २६) हा तरूण ४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पाचोरा येथील बसस्थानकावर आला होता. दरम्यान, आकाश मोरे हा त्यांच्या दुचाकीवर बसलेला होता. याच वेळी दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती आकाश मोरे यांच्याजवळ आले. त्यानंतर त्यांनी गावठी कटुवाने आकाशवर १२ राउंड फायर केलेत. यात आकाश मोरे यांच्या कपाळावरील डोक्याजवळ १, डोक्यावर उजव्या बाजुला १, डोक्याच्या उजव्या बाजुला कानाच्या वर १, डोक्याच्या मध्यभागी २, डोक्याच्या मागील बाजुस २, पाठीवर ४ तर छातीत एक अशा १२ गोळ्या झाडण्यात आल्यात. यामुळे आकाश मोरे या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. त्यांना घटनास्थनावरून तत्काळ पाचोरा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, त्या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी तपासणी करुन आकाश मोरे यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती शहरात वा-यासारखी पसरल्यानंतर बस स्थानक परिसरासह ग्रामीण रूग्णालय येथे नातेवाइकांसह नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्यान ही घटना पूर्ववैमनस्य आणि आर्थिक देवाण घेवाणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पाचोरा येथील घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळाची पाहणी करून स्थानिक पोलिसांकडून या घटनेबाबत माहिती जाणून घेतली. तसेच तपासाची दिशा ठरवली आहे. दरम्यान, मृत आकाश मोरे यांच्या पक्षात वडिल, १ भाऊ आणि १ बहिण अस्सा परिवार आहे.



