Home » राष्ट्रीय » जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांची ‘या’ दिवशी आरक्षण सोडत !

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांची ‘या’ दिवशी आरक्षण सोडत !

जळगाव : प्रतिनिधी

राज्यभरातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक आयोगाने आरक्षण जाहिर झाल्यानंतर व पंचायत समिती सभापतींच्या आरक्षण सोडतीचा देखील कार्यक्रम जाहिर झाला आहे. आता निवडणुक आयोगाने पंस व जिल्हा परिषदेच्या गट व गणांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला असुन दि.१३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात जाहिर केली जाणार असुन गणांचे आरक्षण तहसील कार्यालयांमध्ये जाहिर होणार आहे.

जि.प व पंचायत समितीच्या निवडणूकीचा बिगुल दिवाळीनंतर वाजणार असल्याचे दिसुन येत आहे. गेल्या महिन्यातच जि.प अध्यक्षांचे आरक्षण सर्वसाधारण साठी जाहिर झाले आहे. त्यानंतर जिल्हयातील १५ पंचायत समितींमध्ये कोणत्या प्रवर्गाचा सभापती होणार हे दि.९ रोजी ठरणार आहे. आज निवडणूक आयोगाने जि.प व पंचायत समिती गट व गणांचे आरक्षण सोडतसाठी तारीख जाहिर केली आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये यंदा पासून नविन आरक्षण पध्दत लागु करण्यात आल्याने यावेळेस रावेर लोकसभा मतदार संघातील रावेर, या वल, चोपडा, मुक्ताईनगर व यावल तालुक्यातील अनेक गट हे राखील होण्याची शक्यता आहे. एस.सी व एस.टीची लोकसंख्या उतरत्या क्रमाने धरली जाणार असल्याने सर्वाधिक रावेर लोकसभेतील गट राखीव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे पत्ते जि.प निवडणुकीतून कट होणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात अनेकं जुन्या सदस्यांना जि.प निवडणुक लढण्याची संधी मिळणार आहे. कारण जुन्या आरक्षण पध्दतीने सर्वाधिक गट हे या तालुक्यांमध्ये राखीव होणार होते. त्यापुर्वीच शासनाने नव्याने आरक्षण पध्दती लागु केल्याने या भागातील अनेक माजी सदस्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. त्यामुळे अनेकांना यावेळी निवडणुक लढण्याची संधी मिळणार आहे.

आरक्षण सोडत दि.१३ ऑक्टोबर रोजी जाहिर झाल्यानंतर दि.१४ पासून जि.प व पंस आरक्षण सोडतीवर हरकती मागण्यात येणार असुन त्यासाठी ४ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. त्या हरकती जिल्हाधिकारी आयुक्तांकडे गोषवारासह सादर करतील. आयुक्तांकडून ३१ रोजी आरक्षण अंतिम केले जाईल. ३ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षणाचे राजपत्र प्रसिध्द होईल.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *