November 5, 2026 4:15 pm

लाईव्ह न्यूज :
जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्हा बँक निवडणुकीत अर्जुन पवार मैदानात! ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल
लाईव्ह न्यूज :
जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्हा बँक निवडणुकीत अर्जुन पवार मैदानात! ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल
Home » महाराष्ट्र » जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश

जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील पात्र नवीन, विस्तारीकरण आणि विविधीकरण उद्योग घटकांना आता विदर्भ व मराठवाड्याप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहने मिळणार आहेत. यासंदर्भात उद्योग, गुंतवणूक, सेवा व खनिकर्म विभागाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.

जळगाव जिल्ह्याचा औद्योगिक विकास अधिक वेगाने व्हावा आणि इतर विकसित औद्योगिक क्षेत्रांच्या तुलनेत जिल्ह्यातील उद्योगांना मिळणारा लाभ वाढावा, यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न केले होते. संपूर्ण जळगाव जिल्ह्याला घोषित करण्यात आलेल्या ‘डी प्लस’ दर्जाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून उद्योगांना विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी उद्योगमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती.

अखेर राज्य शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नवीन, विस्तारीकरण आणि विविधीकरण उद्योगांना लाभ

 

शासन निर्णयानुसार, जळगाव जिल्ह्यातील पात्र सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठे, विशेष मोठे, विशाल आणि अतिविशाल उद्योग घटकांना नवीन सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत औद्योगिक प्रोत्साहनांचे लाभ मिळणार आहेत. यामध्ये नवीन उद्योगांची स्थापना, विद्यमान उद्योगांचे विस्तारीकरण तसेच उद्योगांचे विविधीकरण करणाऱ्या घटकांचा समावेश आहे.

 

या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्याचा समावेश विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धुळे या वर्गीकृत क्षेत्रांप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहनांसाठी करण्यात आला आहे. मात्र, संबंधित उद्योगांना गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीचे निर्धारित निकष पूर्ण करणे आवश्यक असून, प्रोत्साहनांचे लाभ योजनेतील अटी व शर्तींनुसार मिळणार आहेत.

 

गुंतवणूक वाढणार, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार

 

या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यात नवीन उद्योग उभारणीस प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच विद्यमान उद्योगांना विस्तार करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती, नवउद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असून, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होऊ शकते.

 

जळगाव जिल्ह्याला केवळ ‘डी प्लस’ औद्योगिक दर्जाची घोषणा नको, तर त्यानुसार प्रत्यक्ष प्रोत्साहनांचे लाभ मिळावेत, अशी भूमिका आमदार सुरेश भोळे यांनी सातत्याने मांडली होती. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचे आभार

 

या निर्णयासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.

शासनाच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळून उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!