September 26, 2026 10:55 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

सावदा गावा नजीक अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई

जळगाव : प्रतिनिधी रावेर ते सावदा रस्त्यावर गस्त करीत असताना अवैध वृक्षतोडीचा प्रकार समोर आला आहे. रावेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. 26 जानेवारी रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास रावेर ते सावदा रस्त्याने गस्त करीत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी सावदा गावाजवळ टाटा कंपनीच्या MH -04 FJ […]

मोठी बातमी : सुनील महाजनांचा अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील गिरणा पंपीग येथील ब्रिटीश कालीन जुन्या पाणी पुरवठा योजनेतील पाईप चोरी प्रकरणातील संशयित तथा महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना उच्च न्यायालयाने अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सविस्तर वृत्त असे की, गिरणा पंपींग येथील ब्रिटीशकालीन पाणीपुरवठा योजनेतील जुने पाईप चोरी करून नेले जात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली […]

पुलावरून बस कोसळली : ५ गंभीर तर २० किरकोळ जखमी

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच सांगली जिल्ह्यातील इटकरे येथे पुणे- बंगळुरु आशियाई महामार्गावर तांदुळवाडी जवळ गुरव पुलावरून एसटी बस क्रमांक MH १४ B T४२०३ खाली कोसळली. या अपघातात ५ प्रवासी गंभीर जखमी तर २० जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी १०:३० च्या दरम्यान घडला. अपघातानंतर जखमींना स्थानिकांच्या […]

‘छावा’ चित्रपटातील वादग्रस्त सीन हटवला ; मंत्री सामंत

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या ट्रेलरमधील छत्रपती संभाजी महाराज नृत्य करताना दाखलेला सीनवर काहींनी आक्षेप नोंदवला होता. तसेच तो सीन काढल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. दरम्यान, चित्रपटातील वादग्रस्त सीन हटवल्याची माहिती मंत्री उदय सामंत […]

मुंडेंविरोधातील पुरावे दादांना देणार ; दामानियांनी मागितली वेळ !

मुंबई : वृत्तसंस्था बीड येथील सरपंच संतोष देशमुख प्रकरण आता जोरदार चर्चेत आले असतांना त्यांनतर राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, संशयित वाल्मीक कराड आणि त्याचे सहकारी यांच्या विरोधात अनेक पुरावे सादर केले. दरम्यान त्यांनी अनेक खळबळजनक दावे देखील केले. तसेच […]

मनसे पुन्हा आक्रमक : नेते हॉटस्टारच्या कार्यालयात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे आता पुन्हा एकदा मनसे आक्रमक होत आगामी स्थानिक निवडणुकीसाठी सज्ज होत असल्याची तयारी सुरु असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच्या मराठीच्या मुद्यावरून आवाज उठवत असते. ओटीटी अॅपवरही मराठी भाषा देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर क्रिकेटचे प्रक्षेपण होत असताना […]

शुल्लक कारणाने ग्राहकाने केला तरुण दुकानदाराची हत्या !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही आहे छोट्या मोठ्या कारणावरून गुन्हेगारी घटना घडत असतांना आता सांगली शहरातील एका घटनेवरून थरार रंगला आहे. केवळ पन्नास रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीवरून दुकानदार तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सांगली बस स्थानक जवळ असलेल्या एका मोबाईल शॉपीमध्ये हा प्रकार घडला. यामुळे सांगली शहरात प्रचंड भीतीचे […]

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज होणार महाकुंभमेळ्यात सहभागी !

प्रयागराज : वृत्तसंस्था देशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात कोट्यावधी भाविकांनी सहभाग नोंदविला आहे तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाकुंभमेळ्यात सुमारे साडेसात तास सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहतील. सकाळी साडेअकराच्या सुमारास बामरौली विमानतळावर शहा यांचे आगमन होणार आहे. तेथून निषादराज क्रूझने व्हीआयपी घाटावर येतील. गृहमंत्री अमित शहा संगमात स्नान करतील. […]

या राशीतील व्यक्ती एकमेकांच्या मदतीने व्यवसाय पुढे न्याल !

मेष राशी आज आरोग्याच्या बाबतीत तडजोड करू नका. कष्ट करूनही अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ राहू शकता. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. नोकरीतील महत्त्वाच्या पदावरून तुम्हाला हटवले जाऊ शकते. तुमच्या चांगल्या कामाची समाजात प्रशंसा होईल. कुटुंबासमवेत देवाचे दर्शन घडेल. वाहन वापरताना काळजी घ्या. वृषभ राशी प्रयत्नांना चालना मिळेल. महत्त्वाच्या कामाचे नेतृत्व कराल. व्यावसायिक […]

error: Content is protected !!