September 24, 2026 8:47 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

महायुतीच्या पहिल्या अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेसाठी ३६  हजार कोटींची तरतूद !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.  यात लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 24 लाख महिलांना लखपती दीदी करणार असल्याची घोषणा […]

राज्याचा अर्थसंकल्प जाहीर : तरुणांना मिळणार रोजगार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी राज्याच्या शाश्वत विकासाचा रुपरेषा हातात घेण्यात आली आहे. महाराष्ट्र […]

मुंडेंच्या आदेशावर अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या बीड येथील सरपंच देशमुख खून प्रकरणी आरोप प्रत्यारोप होत असतांना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यास कारवाई करू असे जाहीर केले होते. मात्र, दमानियांच्या मते, या प्रकरणातील […]

मध्यप्रदेशात भीषण अपघात ; चारचाकी व ट्रकच्या धडकेत ७ ठार तर १४ जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आज पहाटेच्या सुमारास मध्यप्रदेशच्या सिधी जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. ट्रक आणि SUV यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकृत सूत्रांकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू […]

शिंदे सेनेचा कॉंग्रेसला मोठा धक्का : माजी आमदारांचा होणार पक्ष प्रवेश !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार पक्षप्रवेश सुरु असतांना आता काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. माझी कोणावरही नाराजी नाही, काँग्रेसने प्रेम दिले त्यासाठी मनापासून आभार, पक्ष सोडताना दु:ख होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चेनंतर तारीख ठरवणार […]

शोरूममध्ये चोरी करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद !

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चौधरी टोयाटो व सातपुडा ऑटोमोबाईल या चारचाकी वाहनाच्या शोरुममध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी मध्यप्रदेशातील तीन जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते भुसावळ दरम्यान तरसोद फाट्यासमोर असलेल्या चौधरी टोयाटो सातपुडा ऑटोमोबाईल या चारचाकी वाहनाच्या शोरुममध्ये गेल्या महिन्यात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केली होती. यात […]

शेताच्या गव्हात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह !

वरणगाव : प्रतिनिधी तळवेल शिवारात रविवारी सकाळी एका शेताच्या गव्हात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्या इसमाचा मृत्यु आठ दिवसापूर्वी झाला असल्याने मोकाट कुत्र्यांनी मयताच्या शरीराराचा एक हात व एका पायाचे लचके तोडल्याचे आढळून आले. सुरुवातीला खुनाची अफवा पसरली होती. तर या घटनेचा पोलीसांनी – पंचनामा करून मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला. पोलिसांनी […]

विजयाचा जल्लोष अन फटाक्यांची आतषबाजीनंतर गवताला लागली आग !

जळगाव : प्रतिनिधी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर विजयाचा जल्लोष साजरा करताना तरुणांनी काव्यरत्नावली चौकात फटाक्यांची आतषबाजी केली. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानावरील गवताला आग लागली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन बंबांनी तत्काळ धाव घेत ही आग आटोक्यात आणली. भारत विरुद्ध न्यूझिलँड यांच्यात आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा […]

१२ वर्षांनंतर रचला भारताने इतिहास : चॅम्पियन्स ट्रॉफी कोरले नाव !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. हे भारताचे हे आयसीसी स्पर्धेतील सलग दुसरे जेतेपद आहे. यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर भारताने १२ वर्षांनंतर तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताने २५२ धावांचे लक्ष्य ४९ षटकांत ६ विकेट्स गमावून […]

निष्काळजीपणामुळे तुमची फसवणूक होऊ शकते !

आजचे राशिभविष्य दि.१० मार्च २०२५ मेष श्रीगणेश म्‍हणतात की, आज मित्र आणि नातेवाईकांसोबत महत्त्‍वाच्‍या विषयावर चर्चा होईल. व्यक्तिमत्त्वात अधिक सकारात्मक बदल होतील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्‍वास ठेवू नका. निष्काळजीपणामुळे तुमची फसवणूक होऊ शकते याची जाणीव ठेवा. व्यावसायिक कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल विचारपूर्वक करा.   वृषभ श्रीगणेश सांगतात की, आज संवाद कौशल्‍याने तुमचा प्रभाव टिकवून ठेवाल. […]

error: Content is protected !!