जयभीम पदयात्रा उत्साहात पार; विविध विभागांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, ‘मेरा युवा भारत’, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “जयभीम पदयात्रा” चे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले. या पदयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, […]
रिक्षाचालक नग्न होवून केला युवतीचा पाठलाग !
नाशिक : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना आता नाशिक शहरात रिक्षाचालकांच्या दादागिरीचे अनेक प्रकार समोर असतानाच आता एका रिक्षाचालकाने रस्त्याने जाणाऱ्या वीसवर्षीय युवतीसमोर नग्न होत तिचा पाठलाग केला. तसेच अश्लील शब्द वापरले. मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी काही तासांतच संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडिता गुरुवारी […]
मध्यस्थी करायला गेलेल्या रिक्षाचालकाची हत्या !

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक शहरातील श्रमिकनगर परिसरातील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये एका व्यक्तीवर टोळक्याने हल्ला केला. हा वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या रिक्षा चालकावर टोळक्याने फायटर व कोत्याने वार केल्याने रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. प्रकाश मधुकर सूर्यवंशी (३९, रा. कडेपठार चौक, स्वामी नरेंद्र छाया हाईट्स, गंगासागर नगर, श्रमिकनगर, सातपूर) असे मध्यस्थी करणाऱ्या मृत रिक्षा चालकाने नाव […]
गुन्ह्याचा तपास नसतानाही घेतली दोघांनी लाच !

जळगाव : प्रतिनिधी कौटुंबिक हिंसाचाराच्या दाखल गुन्ह्यामध्ये अटक न करणे, योग्य ती मदत करणे तसेच वरिष्टांना अहवाल न पाठविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये शहर पोलिस ठाण्याचा पोलिस हवालदार रवींद्र प्रभाकर सोनार (वय ४६) व पोलिस नाईक धनराज नारायण निकुंभ या दोघांचा […]
अयाज मोहसीन यांची इलेक्ट्रॉनिक डिजिटल मिडीया जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड.

जळगाव : प्रतिनिधी मिरज -सांगली येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे राज्यस्तरीय अधिवेशन मोठया थाटात पार पाडले. यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटिल, मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटिल, आमदार गोपीचंद पडळकर,विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, सांगली जिल्हा पोलिस अधिक्षक संदिप घुगे, ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेश संघटक संजय भोकरे.राज्यसरचिटणीस डॉ. विश्वास […]
जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या !

जळगाव : प्रतिनिधी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जिवे ठार मारण्याची धमकी असणारा मेल पाठविण्यात आला असून सीएमओ कार्यालयाने त्याची दखल घेत तो गृहसचिवांसह जळगाव पोलिसांना पाठविला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात अनेक अधिकाऱ्यांनादेखील असे धमकीचे मेल आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना […]
तणावपूर्ण परिस्थितीचा अनुभव येऊ शकतो.

आजचे राशिभविष्य दि.१३ एप्रिल २०२५ मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, सकारात्मक दृष्टीकोन असणार्या लोकांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. संपर्कक्षेत्रात वाढ होईल. आज घाईघाईत घेतलेले निर्णय बदलावे लागतील. कौटुंबिक जबाबदारीमुळे तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी वेळ काढू शकणार नाही. तणावपूर्ण परिस्थितीचा अनुभव येऊ शकतो. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज सामाजिक कार्यात तुमचा सहभाग असेल. […]