सरकारच्या निर्णयामुळे मद्यप्रेमींच्या खिशाला बसणार मोठी झळ !

मुंबई : वृत्तसंस्था देशात बिअरचे दर कमी होतील अशा बातम्यांमुळे मद्यप्रेमींना आनंद झाला होता. मात्र, आता राज्य सरकारने उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दारूविक्रीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मद्यप्रेमींच्या खिशाला मोठी झळ बसणार असून, त्यांचं “सेलिब्रेशन”ही महागणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत IMFL (भारतीय बनावटीचे विदेशी मद्य) विक्रीवर कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या शुल्कवाढीमुळे राज्याच्या […]
दुर्देवी : नदीत स्नानासाठी गेलेले ११ तरुण बुडाले : आठ जणांना जलसमाधी !

जयपूर : वृत्तसंस्था देशातील राजस्थानमधील टोंक येथून मंगळवारी येथे एक दुःखद घटना घडली. जयपूरमधील ११ तरुण बनास नदीत स्नानासाठी गेले होते आणि जोरदार प्रवाहात ते सर्व जण वाहून गेले. सर्व तरुण दुपारी १२ वाजताच्या सुमारास पिकनिकसाठी नदीच्या जुन्या पुलाजवळ पोहोचले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. यामध्ये आठ जणांना जलसमाधी मिळाली असून तीन जणांचा शोध सुरू […]
महायुती सरकारने राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यानुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणण्यात येणार आहे. सामाजिक न्यायाचे तत्त्व प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यात २००५ मध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली होती. केंद्र शासनामध्ये अनुसूचित जाती व […]
शरद पवार निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला देणार संधी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापनदिन कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक प्रमुख नेत्यांनी भाषण करत शरद पवार यांच्याविषयी तसेच पक्षाच्या संघर्षाविषयी भाष्य केलं. त्यानंतर शरद पवारांनी पक्षातील नेतृत्व बदलावर देखील मोठे विधान केले आहे. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवार म्हणाले, 26 वर्षांपूर्वी आपण […]
चांदीच्या दराने ओलांडला एक लाखांचा टप्पा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील बाजारात गेल्या काही दिवसापासून चांदीला मोठी मागणी कायम असून अशा परिस्थितीत सोमवारी चांदीचा दर दिल्ली सराफा 1,000 रुपयानी वाढून 1 लाख 8 हजार रुपये प्रती किलो या पातळीवर गेला. दिल्ली सराफात सोन्याचा दर मात्र 280 रुपयांनी कमी होऊन 97,780 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. चांदीचा दर एकतर्फे वाढत […]
एलसीबीची मोठी कामगिरी : तलवार व कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या संशयिताला अटक !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून शहरातील अनेक ठिकाणी तलवार व कोयत्यासारखी शस्त्रे घेऊन खुलेआम फिरून दहशत माजवण्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा व्यक्तींविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने इस्माइल गल्लीतून एका संशयितास अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे […]
चौघांनी केली पतीसह पत्नीला जबर मारहाण !
जळगाव : प्रतिनिधी जून्या भांडणाच्या कारणावरुन आनंद भगवान पवार (वय ३०, रा. मोहाडीरोड, खुबचंद टॉवरजवळ) यांच्यासह त्यांच्या पत्नीला चौघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. ७ रोजी सायंकाळच्या सुमारास मोहाडी रोडवरील खुबचंद टॉवजवळ घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मोहाडी रोडवरील खुबचंद टॉवरजवळ आनंद भगवान पवार हा […]
एलसीबीची कारवाई : मध्यप्रदेशातून गावठी कट्टूयाची तस्करी करणारे अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी मध्यप्रदेशातून गावठी कट्टूयाची तस्करी करणाऱ्यांना पथकाने थांबवले. मात्र ते पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जावू लागले. एलसीबीच्या पथकाने त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत संशयित गोविंदसिंग ठानसिंग बरनाला (वय ४५, रा. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश) व निसानसिंग जीवनसिंग बरनाला (वय २३, रा. उमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी. ह. मु. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश) […]
गोलाणी मार्केटमध्ये दोन्ही गटात जोरदार हाणामारी !

जळगाव : प्रतिनिधी मोबाईल दुरुस्तीसाठी आलेल्या दुकानावर चोरीच्या संशयावरुन ग्राहक आणि दुकानदारामध्ये वाद झाला. त्यांचे वादाचे रुपांतरण हाणामारीत होवून दोन्ही गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. मार्केटमध्ये अफवांना पेव फुटल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये घडली. माहिती मिळताच शहर पोलिसांनी […]
पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा

आजचे राशीभविष्य दि.१० जून २०२५ मेष राशी श्रीगणेश सांगतात की, वैयक्तिक कामात व्यस्त राहाल. घरात धार्मिक कार्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहील. आपल्या योजना गोपनीय ठेवा, अन्यथा कोणीतर त्याचा गैरफायदा घेईल. इतरांच्या खासगी गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. बेकायदेशीर कामांकडे आकर्षित होऊ नका, कारण तपास किंवा दंड यांसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. वृषभ राशी […]