September 28, 2026 10:44 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच पीएम मोदींसह एकनाथ शिंदेंना दिले निमंत्रण !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने त्रिभाषा धोरणाचा शासकीय निर्णय (जीआर) रद्द केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी मराठी अस्मितेच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी ५ जुलै २०२५ रोजी वरळी डोम येथे भव्य विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर […]

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला घेरले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या संदर्भात विविध प्रश्न मांडत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला जाब विचारला. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची मागणी देखील दानवे यांनी केली आहे. राज्य सरकारने पिक विमा योजना बंद केली असून राज्यातील काही जिल्ह्यात पिक […]

कृषी दिनानिमित्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन – शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

जळगाव, दि. १ जुलै २०२५ (जिमाका वृत्तसेवा) – शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाची कास धरत शेतीत नवनवीन प्रयोग करून प्रयोगशीलता अंगीकारली पाहिजे. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळावे आणि स्वतः निर्यातक्षम बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. कार्यक्रमास […]

ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या हिंदीच्या मुद्यावर सरकारने निर्णय घेतल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याला वाजत – गाजत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे हे दोन्ही भाऊ या मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार […]

पोहण्याचा मोह अनावर : तीन बालमित्रांचा बुडून दुर्देवी मृत्यू !

नाशिक : वृत्तसंस्था सुट्टीच्या दिवशी चार बालमित्रांना पोहण्याचा मोह अनावर झाला. पण यातील एक जण घरी अाई वाट बघत असेल म्हणून माघारी फिरला आणि पोहण्याचा मोह अनावर झालेल्या ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. सोमवारी सकाळी ९ वाजता बिडी कामगार नगर रोडवर एका बांधकाम साइटवर खोदलेल्या खड्ड्यात तिघांचेही मृतदेह एकमेकांना वाचवण्याच्या […]

तेलंगणात औषध कारखान्यात स्फोट ३० हून अधिक मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था तेलंगणा राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील औषध कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. कारखान्यातून ३१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याच वेळी, रुग्णालयात ३ जणांचा मृत्यू झाला. ३० हून अधिक जण जखमी आहेत. पसुमिल्लाराम औद्योगिक क्षेत्रातील सिगाची इंडस्ट्रीजमध्ये सकाळी ८:१५ ते ९:३० च्या […]

जंगलात आढळला महिलेचा मृतदेह : संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील सुमठाणे येथील वनक्षेत्राच्या कुरण जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडलेल्या शोभाबाई रघुनाथ कोळी (वय ४८, रा. उंदिरखेडे, ता. पारोळा) यांच्या मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटवली. त्यानंतर तपासचक्रे फिरवित महिलेचा खून करुन पसार होत असलेल्या अनिल गोविंदा संदांशिव (वय ४५, रा. उंदीरखेडे, ता. पारोळा) याच्या मुसक्या आवळल्या. त्याला खाक्या दाखविताच महिलेकडे असलेल्या सोन्यांच्या दागिन्यांसाठी आणि […]

मुलीचे परस्पर लग्न : जळगावच्या वधू व मध्यस्थांविरुध्द गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी येथील तरुणीला नोकरीच्या आमिषाने नाशिकला नेत काही जणांनी तिचे कोल्हापूरच्या मुलाशी परस्पर लग्न लावून देण्याच्या प्रकरणात आता वर मुलाने जळगावची वधू व मध्यस्थांविरुध्द तक्रार दिली आहे. त्यावरून मुलीसह पाच जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. आशिष सदाशिव […]

भरधाव वाहनाची दुचाकीला जबर धडक : तरुण शेतकरी जागीच ठार !

चाळीसगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतान आता जळगाव- चांदवड महामार्गावरील चाळीसगाव शहराला लागून असलेल्या खडकी बु, या गावातून गेलेल्या महामार्गावर सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गावातील आबा जानराव (धनगर) […]

या राशीतील लोकांना आज रोजगाराची संधी मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.१ जुलै २०२५ मेष राशी आजचा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. उच्चपदस्थ आणि प्रतिष्ठित लोकांशी संपर्क वाढतील. कामाच्या ठिकाणी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. सकारात्मक विचारसरणी ठेवा. तुमचे मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. राजकारणात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील. तुम्ही परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. वृषभ राशी आज तुम्हाला व्यवसायात नवीन मित्र मिळतील. नोकरीत तुम्हाला […]

error: Content is protected !!