उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत,” ; भाजप आमदाराची जहरी टीका !

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत,” अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. सांगलीतील जतमध्ये एका कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर, […]
मनसे नेत्याच्या मुलाचा दारू पिऊन राडा : अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिवीगाळ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईच्या अंधेरी परिसरात मनसे नेत्याच्या मुलाने दारू पिऊन एका कारला धडक दिली. ज्या गाडीला धडक दिली ती गाडी होती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेची. या अपघातानंतर राजश्रीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यात मनसे नेत्याचा मुलगा राहील शेख हा अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसून आले तसेच त्याने शिवीगाळ देखील केल्याचे दिसून […]
पुण्यात खळबळ : तरुणाकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला नामक तरुणाने भगवे वस्त्र परिधान करत महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला आहे. सुरज शुक्ला या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, घटनेनंतर कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कॉंग्रेस पक्षाचे शहर […]
खळबळजनक : कुटुंबातील तिघांचा विहिरीत तर एकाने संपविले आयुष्य ; २४ तासात परिवार संपले !

सोलापूर : वृत्तसंस्था पंढरपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुटुंबातील तिघांचा विहिरीत तर एकाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. अवघ्या 24 तासात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. हि संपूर्ण घटना घरगुती वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हमाजी आसबे, पत्नी मोनाली आसबे, मुलगी ऐश्वर्या आणि मुलगा कार्तिक असं […]
…सर्व पैसा फक्त काही श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचतोय ; केंद्रीय मंत्री गडकरींचे विधान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गरिबीबाबत दिलेल्या विधानामुळे मोदी सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी,”देशात गरिबी वाढत आहे आणि सर्व पैसा फक्त काही श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे मोठे विधान केले आहे. नितीन गडकरी यांनी यावेळी, “वाढत्या गरिबीच्या […]
उपमुख्यमंत्री पवारांविषयी बेताल वक्तव्य : हाकेंना पाठविली कायदेशीर नोटीस !

पुणे : वृत्तसंस्था महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या व त्यांना शिवराळ भाषेत बोलणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी ही नोटीस बजावली असून, हाके यांनी सात दिवसांत अजित पवार यांची लेखी माफी मागावी, अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा नितीन […]
मला न्यायालयाच्या तारखेवर हजर करा : कैदीने केली कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी मला न्यायालयाच्या तारखेवर हजर करा, असे म्हणत हर्षद रब्बी पटेल (वय २१, रा. सुप्रिम कॉलनी) याने जिल्हा कारागृहात गोंधळ घातला. तसेच बॅरेकमध्ये जाण्यास नकार देत कर्तव्यावर हजर असलेल्या अंबादास जुलाल देवरे (वय ४०, रा. कारागृह वसाहत) या कर्मचाऱ्यास मारहाण केली. ही घटना ५ जुलै रोजी जिल्हा कारागृहात घडली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात […]
कत्तल करुन गोमांसाची विक्री करणाऱ्यांवर छापा !

जळगाव : प्रतिनिधी गोवंशाची कत्तल करुन मांस विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्यांवर शनिपेठ पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईमध्ये ५० किलो गोमांससह कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण १० हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रविवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास शहरातील ईस्लामपुरा भागात केली. याप्रकरणी सादिक साबीर शेख (वय २८, रा. ईस्लामपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल […]
पैसे घेवून लग्न लावून फसवणूक प्रकरणी आणखी दोघ महिलांना अटक !

जळगाव : प्रतिनिधी दोन लाख रुपये रोख आणि चार तोळे सोन्याचे दागिने घेवून तरुणी सोबल लग्न लावून देत कोल्हापूर येथील तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मिनाक्षी उर्फ मनिषा दिनेश जैन उर्फ पल्लवी राजपूत (वय ३३, रा. विवेक कॉलनी, गाडगेबाबा चौक) व रमा सुशिल कनौजिया (वय ३६, रा. चुंचाळे शिवार नाशिक) या दोघ […]
या राशीतील लोकांना आजचा दिवस उत्तम जाणार !

आजचे राशिभविष्य दि.७ जुलै २०२५ मेष राशी आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींना खूप चांगला जाईल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल. व्यवसाय क्षेत्रात असलेल्या लोकांना आज विश्वासू भागीदार मिळेल, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा मिळेल. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस भाग्यवान ठरेल. त्यांना अपेक्षित स्थळ मिळेल. ज्यामुळे त्यांचा विवाह […]