छताला लावलेल्या दोरीचा गळफास लागून १२ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील विद्यानगरात दि. ७ जुलै रोजी दुपारी छताला लावलेल्या दोरीचा गळफास लागून १२ वर्षीय हार्दिक प्रदीपकुमार अहिरे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अहिरे कुटुंबावर शोककळा पसरली असून, रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, विद्यानगरातील रहिवासी प्रदीपकुमार अहिरे हे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. […]
इथे काय होणार ते आम्ही ठरवणार : मनसे नेत्याचा थेट इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये मनसे, ठाकरे गटाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्रालय आणि पोलिसांवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याशिवाय स्वत:मोर्चामध्ये सहभागी होण्यास जाणार आहे, हिंमत […]
मोठी बातमी : मनसेच्या मोर्चात शिंदेंचे मंत्री सहभागी होताच आंदोलक आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी आलेल्या परिवहन मंत्र्यांना आंदोलकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपस्थितीविरोधात “पन्नास खोके… जय गुजरात” अशा घोषणा दिल्या. या गोंधळादरम्यान एका आंदोलकाने त्यांच्या दिशेने बाटली भिरकावल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत मंत्र्यांना सुरक्षितपणे […]
तामिळनाडूत रेल्वेची स्कूल बसला धडक ; दोन मुलांचा दुर्दैवी अंत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील आज सकाळी सेम्मनकुप्पम गावात एक दुःखद घटना घडली. ही घटना घडली जेव्हा एक स्कूल व्हॅन रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या अपघातात अनेक जण जखमी झाले. कुड्डालोरच्या सेम्बनकुप्पम याठिकाणी स्कूल बस रेल्वे […]
विधानसभेत OYO हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्न ; भाजपचे माजी मंत्री आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी OYO हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी OYO हॉटेल्सबाबत गंभीर आरोप केले आहेत. अनेक ठिकाणी ओयोशी संलग्न असलेल्या हॉटेल्समध्ये केवळ एका तासासाठी खोली भाड्याने का मिळते? याचा पोलिस विभागाने अभ्यास करावा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी […]
राज्यात रिक्त पदांसाठी होणार मेगाभरती ; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी माहिती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने सर्व विभागांना दीडशे दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. यात सर्व विभागांना आकृतिबंध, नियुक्ती नियमांत सुधारणा आणि अनुकंपा तत्त्वावरील भरती 100 टक्के करण्याची उद्दिष्टे दिली आहेत. त्यातून राज्यातील रिक्त पदांची नेमकी आकडेवारी समोर येईल. त्यानंतर या रिक्त पदांसाठी मेगाभरती करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. […]
अकरावीत प्रवेश घेण्यापूर्वीच मुलीने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी बहिणीच्या अकरावीच्या प्रवेशाकरीता भाऊ महाविद्यालयात गेलेला असतांना, खूशी चैत्राम जाधव (वय १७, रा. रामेश्वर कॉलनी) या बहिणीने घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीत घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजून गेली असून मुलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील […]
धक्कादायक : जळगावातील तरुणाचा झोपेतच झाला दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी सकाळी झोपेतून उठल्यानंतर घराजवळ मित्रांसोबत वेळ घावला. त्यांनतर घरी जावून झोपलेल्या सागर अशोक नन्नवरे (वय २०, रा. समता नगर) या तरुणाचा झोपेतच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास समता नगरात घडली. मुलाच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या कुटुंबियांसह मित्रांना मोठा धक्का बसला असून तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सागरच्या […]
धुळे एसीबीची कारवाई : मुख्याध्यापिकेसह कनिष्ठ लिपिक ३६ हजारांची लाच !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावदा येथील विद्यालयात कार्यरत महिला उपशिक्षिकेची प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी ३६ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना खिरोदा येथील मुख्याध्यापिके सह कनिष्ठ लिपिकाला धुळे एसीबीने अटक केल्याची कारवाई ७ जुलैला सायंकाळी केली. सविस्तर वृत्त असे कि, जनता शिक्षण मंडळ संचालित खिरोद्यातील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पीतांबर महाजन (वय ५७, रा. चिनावल […]
माध्यमे आणि ऑनलाइन क्रियाकलापांकडे बारकाईने लक्ष द्या.

आजचे राशिभविष्य दि.८ जुलै २०२५ मेष राशी उधार दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती चांगली होईल. जवळच्या मित्राचा सल्ला तुमचे कोणतेही विशेष काम पूर्ण करण्यास मदत करू शकतो. सामाजिक संस्थेत तुमचे विशेष योगदान असेल. शेजाऱ्यांशी खोटे वाद घालू नका. त्यामुळे तुमच्या कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात निष्काळजी राहू शकतात. खर्च नियंत्रणात ठेवणे […]