शहर पोलिसांची मोठी कामगिरी : दोन चोरट्यांना घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील ७ गुन्हे जळगाव शहर पोलिसांनी उघडकीस ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि इतर चोरीच्या वाहनांसह एकूण २ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि,जळगाव शहरातील गोलाणी मार्केटसमोर, मायटी ब्रदर्स दुकानासमोरून १४ जुलै रोजी रात्री ८.३० ते […]
धक्कादायक : चंद्रभागा नदीत तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू !

सोलापूर : वृत्तसंस्था पंढरपुर येथून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. अनेक भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत जाऊन स्नान करतात. चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले आहे. यामुळे नदीच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर आहे. नदीच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या तीन महिला भाविकांचा शनिवारी सकाळी बुडून मृत्यू झाला आहे. त्यातील दोन महिलांचे […]
१०वी किंवा १२वीच्या विध्यार्थ्यांना महत्वाची बातमी : सरकार देणार शिष्यवृत्ती !

मुंबई: वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १०वी आणि १२वीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांसोबतच, राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या एका विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, १०वी किंवा १२वीच्या परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे […]
सुवर्ण व्यावसायिकाचा पाठलाग करून दोन कर्मचाऱ्यांनी उकळली रक्कम !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या आठवड्यात सुवर्ण व्यावसायिकाचा पाठलाग करून त्याच्याकडून लाखांमध्ये रक्कम घेण्याचा प्रकार घडल्याने पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले असल्याचे बोलले जात आहे. याविषयी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आठवडाभरापूर्वी एक बंगाली सुवर्ण व्यवसायिक सोने व काही रक्कम सोबत घेऊन […]
मोहननगरात घराचे कुलूप तोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास !

जळगाव : प्रतिनिधी पती-पत्नी कामावर गेलेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १७जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मोहननगरमधील जितेंद्र राजेंद्र खर्चाने (३९, रा. मोहननगर) व त्यांच्या पत्नी विवेकानंद […]
बामणोदचा सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार !

फैजपूर : प्रतिनिधी बामणोद येथील सराईत गुन्हेगार रोहित ऊर्फ सोनट्या नितीन केदारे (वय २३) याला फैजपूर उपविभागीय अधिकारी यांनी सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्याच्या विरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात बरेच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, हवालदार मोती पवार, […]
कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्यापूर्वी अत्यंत हुशारीने गुंतवणूक करा.

आजचे राशिभविष्य दि.१९ जुलै २०२५ मेष राशी नोकरीसाठी राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. वीन नोकरी मिळाल्याने तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही. आज तुम्हाला तुमचे ज्ञान वाढवण्याची संधी मिळेल आणि तुम्ही एकही संधी सोडणार नाही. जर तुम्ही मुलाला कोणतीही जबाबदारी दिली तर ती आज पूर्ण होईल. पालकांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही रखडलेले काम आज पूर्ण होईल. […]