खेळांमध्ये तरूणांचे भविष्य- केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जळगाव : प्रतिनिधी सध्याच्या स्पर्धेच्या युगात पाल्यांमध्ये ताणतणाव निर्माण होत असतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्वाचे म्हणजे कुठलाही खेळ होय. बुद्धिबळ सारख्या खेळात जगात दिव्या देशमुख च्या यशामुळे महाराष्ट्राची शान वाढली आहे. त्यामुळे जग भारताच्या बुद्धिमत्तेला सलाम करत आहे. मुलांनी खेळ छंद म्हणून जोपासण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी शासनस्तरावर सुद्धा स्पोर्टस पॉलिसी […]
पोलिस वर्दीची भिती उरलेली नाही ; खा.सुळेंचा घणाघात !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे, बीडसह दोन-तीन जिल्ह्यांमध्ये सातत्याने गुन्हे वाढत आहेत. पोलिस वर्दी ची भिती उरलेली नाही, लोकांना न्याय मिळत नाही. कोण आहे यामागे? याचा शोध घेण्याऐवजी सरकार मौन बाळगते, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित […]
महाराष्ट्रात ड्रग्स इंस्पेक्टर पदांसाठी भरती जाहीर, पात्र उमेदवार लवकर करा अर्ज

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ड्रग्स इंस्पेक्टर (औषध निरीक्षक) पदांसाठी १०९ भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. इच्छुक उमेदवार MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरून (mpsc.gov.in) अर्ज करू शकतात. पात्रता व वयोमर्यादा फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्समध्ये पदवी अथवा क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये विशेषज्ञता असलेली वैद्यकीय पदवी आवश्यक आहे. वयोमर्यादा आयोगाने अद्याप जाहीर केलेली नाही. पगार व […]
अमरनाथ यात्रेवर पावसाचा प्रचंड फटका; मार्ग दुरुस्तीसाठी तातडीची कामे सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अमरनाथ यात्रा ही ९ ऑगस्टपर्यंत चालणार होती, परंतु मुसळधार पावसामुळे यात्रा मार्गांची गंभीर दुरवस्था झाल्याने ती ३ ऑगस्ट रोजीच थांबवण्यात आली आहे. काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांच्या मते, बालटाल आणि पहलगाम या दोन प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. सतत मशीन आणि कर्मचारी […]
जमीन आमची, निर्णयही आमचा : राज ठाकरेंची गर्जना !

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे पीएम आणि गृहमंत्री ज्या राज्याचे आहेत; त्या राज्याची शेतजमीन कोणीही विकत घेऊ शकत नाही. प्रत्येकजण आपल्या राज्याचा विचार करत असतो. आपण आपल्या राज्याचा विचार का करु नये? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (दि. २ ऑगस्ट) केला. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य संमेलन भरवत आहे. गुजराती बद्दलचे प्रेम नाही आहे, […]
इंस्टाग्रामचा मोठा निर्णय! आता ‘लाईव्ह’ फीचर सर्वांसाठी नसेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मेटाच्या मालकीच्या या कंपनीने आपल्या लोकप्रिय ‘लाईव्ह’ फीचरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, आता प्रत्येक युझरला इंस्टाग्रामवर लाईव्ह जाता येणार नाही. कंपनीने यासाठी एक अट ठेवली असून, यापुढे फक्त निवडक युझर्सनाच हा अधिकार मिळणार आहे. चला […]
विवाहितेचा पैशांसाठी शिवीगाळ आणि मारहाण करत छळ !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील टेलिफोन नगर येथील माहेर असलेल्या एका विवाहितेला सासरच्या मंडळींनी पैशांसाठी शिवीगाळ आणि मारहाण करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ३१ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात विवाहितेच्या पतीसह सासू आणि दोन नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, प्रीती रोशन जैन (वय ३८, रा. टेलिफोन नगर, […]
कांग नदी पात्रात मृत अवस्थेत आढळला बिबट्या !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील गोद्री शिवारातील कांग प्रकल्पाचा उत्तरेस कांग नदी पात्रात दि.१ ऑगस्ट रोजी सकाळचे सुमारास मादी जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला. त्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याचे पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून त्याच्या शरिराचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठविण्यात येणारे आहेत. त्याचे वय अंदाजे ५ ते ६ […]
शेततळ्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू : परिसरात शोककळा !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गणेशपूर येथे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ३८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर येथील हिलाल दगा पाटील (वय ३८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, हिलाल पाटील १ ऑगस्टला सकाळी त्यांच्या शेतात गेले होते. शेततळ्याजवळून जात असताना […]
मध्यान्ह भोजनाचे जिओ टॅगिंगसह दररोज फोटो अनिवार्य – मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचे निर्देश

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या जळगाव जिल्ह्यातील एकूण १८०० शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर आणि नियमिततेवर थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनल करनवाल लक्ष ठेवणार आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शाळांमध्ये मध्यान्ह भोजन ठरवून दिलेल्या प्रती प्रमाणे व मेनू अनुसारच दिले जाणे आवश्यक आहे. याच्या अंमलबजावणीसाठी एक अभिनव पाऊल उचलत, जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी व्हॉट्सॲप ग्रुपच्या […]