September 24, 2026 6:08 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

सवमर्सीबल व सोलर पंप चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळच्या रस्त्यावर 31 मे 2025 रोजी झालेल्या सवमर्सीबल व सोलर पंप चोरीच्या प्रकरणाचा अखेर पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार संशयित आरोपींना अटक करून गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला असून, त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेल्या मालमत्तेचा तपास सुरू आहे. सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल पोलीस स्टेशन […]

मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्वपूर्ण निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना आज मुख्यमंत्री फडणवीस यांंच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (26 ऑगस्ट 2025) संपन्न झाली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले असून शेती, सहकार, कामगार कल्याण, आणि पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर, कामगार कायद्यांत सुधारणा, सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक मदत, […]

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला न्यायालयाचा ब्रेक !

 मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी तीव्र असतांना आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. दरम्यान, “आम्ही सुद्धा आमची बाजू उच्च न्यायालयात मांडू. आम्हाला मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी मिळणारच,” असा विश्वास जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला […]

भाजप नेते व मंत्री संजय सावकारेंचे डिमोशन !

भंडारा : वृत्तसंस्था महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. यापूर्वी पालकमंत्री असलेले भाजप नेते आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जागी आता राज्यमंत्री पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावकारे यांचे एकप्रकारे डिमोशन झाले असून, त्यांना आता बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात […]

जिल्हा परिषदेचे अनोखे पाऊल – नागरिकांसाठी “व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट” सुरू

जळगाव, दि. २५ ऑगस्ट २०२५ जिल्हा परिषद जळगावने नागरिकांसाठी तक्रारी मांडण्याचे व माहिती मिळविण्याचे नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करनवाल (भा.प्र.से.) यांच्या अभिनव संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.हा चॅट बोट क्रमांक जिल्हा परिषदेचे संकेत स्थळ http ://zpjalgaon.gov.in यावर देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना […]

शिवीगाळाचा जाब विचारणाऱ्या दोघांना बेदम मारहाण

जळगाव : प्रतिनिधी शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या राहूल संजय पाटील (वय २८, रा. शिरसोली, प्र.बो. ता. जळगाव) याच्यासह त्याचा मित्राला तिघांनी लोखंडी कड्याने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. २३ रोजी रात्री पावणेबारा वाजता शिरसोली रस्त्यावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील […]

निर्जनस्थळी नेत गतिमंद अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका भागात दि. २४ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गतीमंद बारा वर्षीय अल्पवीयन मुलीला दुचाकीवर बसवून नेत तिच्यासोबत अश्लिल कृत्य करीत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित प्रकाश गोसावी (वय ३८) याच्याविरुद्ध पोस्कोतंर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील […]

उपमुख्यमंत्री शिंदेच्या तोतया पीएला अखेर अटक !

जळगाव : प्रतिनिधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याचे सांगत फसवणूक १८ जणांची ५५ लाख ६० हजार रुपयांमध्ये फसवणुक करणाऱ्या मागावर आर्थीक गुन्हे शाखेचे पथक होते. या पथकाने ठाणे येथे एका घरात लपून बसलेल्या तोतया पीए हितेश रमेष संघवी (४९, रा. नवी मुंबई) याच्या ठाणे याच्या दि. २४ रोजी रात्रीच्या सुमारास बेड्या […]

धावत्या रेल्वेत महिलेचा विनयभंग !

भुसावळ : प्रतिनिधी धावत्या रेल्वेत प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये शेगाव ते जळगाव प्रवासादरम्यान घडली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून यात दोन अल्पवयीन आहेत. युवराज हिम्मत पवार (२२), नरेंद्र संतोष पवार (२२) आणि प्रवीण मधुकर पवार (२१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी महिला पती आणि कुटुंबीयांसह […]

या राशीची मुले आज परिश्रमपूर्वक अभ्यास करतील,

मेष राशी आज दिवसभर नशीब तुमची साथ देईल. आज तुम्ही एक नवीन काम सुरू कराल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. आज सामाजिक कार्यात तुमची आवडही वाढेल. आज तुम्ही आर्थिक बाबींशी संबंधित सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडाल आणि तुमची स्वप्ने […]

error: Content is protected !!