मी कधीही खालच्या पातळीवर जाणार नाही ; मंत्री गडकरी !

नागपूर : वृत्तसंस्था “माझ्या मेंदूची किंमत महिन्याला २०० कोटी आहे. माझ्याकडे पैशांची अजिबात कमतरता नाही आणि मी कधीही खालच्या पातळीवर जाणार नाही,” असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी इथेनॉल धोरणाबद्दलच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर केले. माझ काम आणि प्रयोग पैसे कमावण्यासाठी नसून ते शेतकरी आणि त्यांच्या कल्याणासाठी आहेत, असंही गडकरी म्हणाले. नागपूरमध्ये ॲग्रिकोस वेल्फेअर सोसायटीने […]
हरिविठ्ठल नगरात विवाहितेने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी पती कामावर तर मुले शाळेत गेलेली असताना अनिता किरण कोळी (३१, रा. हरिविठ्ठल नगर) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुले संध्याकाळी शाळेतून आले त्यावेळी त्यांना आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. ही घटना १२ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नगरात हरिविठ्ठल राहणाऱ्या […]
खाली कोसळून तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील आडगाव येथे पत्नीला चहा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जात असताना, २९ वर्षीय तरुण अचानक कोसळला आणि मृत्युमुखी पडला. ही घटना शनिवारी आरोग्य केंद्राच्या आवारात घडली. मिळालेली माहितीनुसार, मृताचे नाव पवन उर्फ पप्पू रमेश खंबायत (वय २९, रा. मालोद, ता.यावल) असे आहे. पत्नीची प्रसूती होऊन तिने शुक्रवारी एका मुलीला जन्म दिला होता. […]
“ज्ञान प्रसारो व्रतम्”चा ८१ वर्षांचा प्रवास साजरा होणार भव्य स्वरूपात

जळगाव : प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९४४ मध्ये झाली.सुरवातीला विद्या प्रसारक संस्थेच्या वास्तुत १९४४ ते १९४९ पर्यंत होती. त्यानंतर दानशूर मूळजी जेठा यांनी दिलेल्या जागेत संस्था उभी राहिली. सर्वांना शिक्षण देण्याच्या उद्देशानं “ज्ञान प्रसारो व्रतम” या ब्रीद वाक्याने शिक्षण प्रसारण करण्यास वचनबद्ध असलेली एक संस्था म्हणून जळगाव (महाराष्ट्र) येथे या संस्थेची स्थापना झाली. […]
एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून तुमची फसवणूक होऊ शकते.

आजचे राशिभविष्य दि.१४ सप्टेंबर २०२५ मेष राशी विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत थोडी चिंता जाणवेल. व्यवसायात तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. शेअर-लॉटरी व्यवसायात सहभागी असलेल्यांना विशेष यश मिळेल. कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात. वृषभ राशी एखादी वाईट, अप्रिय बातमी मिळू शकते. परदेश दौऱ्याचे किंवा स्थलांतराचे संकेत आहेत. मोठ्या कामांचे विचार मनात येत राहतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मिथुन […]