September 24, 2026 3:05 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

अहिल्यानगरात धार्मिक मुद्यावरून वाद : मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अहिल्यानगर येथे सोमवारी आय लव्ह मोहम्मद असा उल्लेख असणारी रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीवरून दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. या मुद्यावरून शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी मुस्लिम समाजाने पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला. त्यामुळे पोलिसांवर बळाचा वापर करण्याची वेळ आली आहे. राज्याचे सामाजिक आरोग्य […]

जागतिक हृदय दिन : तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका !

नेहमी प्रमाणे या वर्षी देखील २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांमध्ये हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि त्यासंबंधित आजारांविषयी जागरूकता निर्माण करणे. तसेच लोकांनी आरोग्यदायी जीवनशैली अवलंबावी यासाठी प्रोत्साहन देणे. तरुणांमध्ये वाढणारा धोका तज्ञांच्या मते, सध्या २५ ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हृदय हे शरीरातील […]

संत ज्ञानेश्वर विद्यालयात किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या समस्यावर मार्गदर्शन !

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई, जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम, जळगाव यांच्या अंतर्गत इंटेन्सिफाइड कॅम्पेनिंग 12 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक शाळेत, महाविद्यालय व गावपातळीवर येथे राबवण्यात येत आहे. याच अनुषंगाने आज दिनांक :२९ सप्टेंबर २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग जिल्हा […]

अवैध गॅस भरताना स्फोट; जामनेर पोलिसांकडून कारवाई सुरू

जामनेर : प्रतिनिधी जामनेर शहरात बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या गॅस भरण्याच्या व्यवसायामुळे मोठा अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चारचाकी वाहनात गॅस भरत असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी संबंधित वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले […]

ई-केवायसी अनिवार्य केल्याने राज्यातील लाडक्या बहिणी चिंतेत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या वेबसाइटच्या तांत्रिक अडचणी आता महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य केलेली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करताना ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई-केवायसीसाठी आवश्यक असलेली वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना वारंवार […]

महायुती सरकारला शरद पवारांनी दिल्या महत्वाच्या सूचना !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील मराठवाड्यासह अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. उभ्या पिकांसह शेतातील सुपीक मातीही वाहून गेली आहे, तर अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य […]

चाळीसगाव तालुक्यात जुन्या वैमनस्यातून कुटुंबावर हल्ला !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आंबेहोळ येथे जुन्या वैमनस्यातून शेतकरी संभाजी गणपत पवार यांच्या कुटुंबावर गावातील सात जणांनी कुऱ्हाडी व लाकडी दांडक्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पवार यांच्या कुटुंबातील महिला व युवक गंभीर जखमी झाले आहेत. तक्रारदार संभाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी तलाठी व गावातील काही जणांविरुद्ध लाचलुचपत विभागाकडे तक्रार […]

जळगावच्या सबजेलमध्ये बंद्याला मारहाण

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा कारागृहामध्ये  गेल्या आठ दिवसांपूर्वीच आलेल्या सोहम गोपाल ठाकरे (वय २०) याला झोपेतून उठवून दोन बंद्यांनी बरॅकच्या दरवाजावर आदळत मारहाण केली. ही घटना २७सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहात घडली. या प्रकरणी कुणाल गोपाल चौधरी व अजय मोरे या दोन बंद्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  एमआयडीसी पोलिस ठाण्यात […]

विहिरीत पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू !

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील होळपिंप्री येथील २८ वर्षीय तरुण शेतकरी विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले असता अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, होळपिंप्री येथील घरातील कर्ता तरुण शेतकरी कल्पेश गोरख पाटील हे विहिरीजवळ पाणी काढण्यासाठी गेले असता अचानक पाय घसरल्याने विहिरीत पडले. त्यांचा जागीच […]

या राशीच्या व्यक्तींना आज कामाचा काहीसा तणाव जाणवणार !

मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरी-व्यवसायातील सकारात्मक बदल तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतील. इतरांना मदत केल्याने आज तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. तुमचे कौतुक होईल. धाडस आणि आत्मविश्वासाने घेतलेल्या निर्णयांमध्ये सहज यश मिळेल. आर्थिक स्थिती ठीक असली तरी खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्यावर अचानक खर्च वाढू शकतो, काळजी घ्या. वृषभ राशी वृषभ राशीच्या […]

error: Content is protected !!