September 23, 2026 8:12 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

अर्धवेळ स्त्री परिचारिकांना दिवाळीपूर्वी मानधन वितरित होणार : मुख्य कार्यकारी अधिकारींच्या निर्देशानंतर कार्यवाहीला गती

जळगाव, दि. १० ऑक्टोबर : अर्धवेळ स्त्री परिचारिकांच्या मानधनाबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, शासनाकडून निधीची उपलब्धता न झाल्यामुळे सप्टेंबर महिन्याचे मानधन जमा होऊ शकलेले नाही, मात्र आता निधी उपलब्ध करून देण्याची तजवीज करण्यात आली असून दिवाळीपूर्वी सप्टेंबर महिन्याचे मानधन वितरित करण्यात येईल. तसेच, ऑक्टोबर महिन्याचे मानधनही त्याचबरोबर देण्यात येणार आहे, अशी […]

धक्कादायक : लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला जबर मारहाण ; १० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव – शिरसोली रोडवरील एका ठिकाणी लव जिहादच्या संशयावरून शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एका तरुणाला जबर मारहाण करून त्याची दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. यात तरुणाला जबर मारहाण केल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात १० जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील […]

उद्धव ठाकरे अशा प्रकारचे मोर्चे काढणार नाहीत ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यासाठी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढविला होता. आता यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर उत्तर दिले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढण्यापूर्वी स्वतःला आरशात पाहा, असा टोला मुख्यमंत्री […]

महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती : केवळ ३० दिवसात होणार जमीन मोजणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेत असताना आता राज्‍यातील जमीन मोजणी प्रकरणे आता ३० दिवसांमध्‍ये मार्गी लागणार आहेत. यासंदर्भात महसूल विभागाने महत्त्‍वपूर्ण निर्णय घेतला असून, यासंदर्भातील अधिसूचनाही सरकारने जारी केला आहे. तसेच याबाबतची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक्‍स’पोस्‍टच्‍या माध्‍यमातून दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्‍या एक्‍स पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे […]

स्थानिक निवडणुकीतील महायुतीच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे विधान !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शक्य तेथे महायुती केली जाईल. जेथे तुल्यबळ परिस्थिती असेल तेथे मैत्रीपूर्ण लढती करू, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गत निवडणुकांमध्ये आम्हाला चांगले यश मिळाले होते. आगामी निवडणुकांमध्ये त्यापेक्षाही अधिक चांगले यश मिळेल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या […]

बापरे : १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतान आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देत मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर तरुणाने अत्याचार केला. हा प्रकार एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडला. याप्रकरणी तालुका पोलिस मुन्ना ठाण्यात फरहान उर्फ उसनुद्दीन […]

नापिकीच्या संकटामुळे शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू !

रावरे : प्रतिनिधी तालुक्यातील खानापूर येथील संजय शालीग्राम धांडे (वय ६१) हे सततच्या पावसामुळे एकरभर शेतात निर्माण झालेल्या तणातील गवताचे रान कापून घरी परत जात असताना त्यांना शेत नापिकीचा मानसिक धक्का बसल्याने वाटेतच अचानक कोसळून मृत्यू झाला. ही घटना १० ऑक्टोबरला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलाजवळ घडली. यावेळी त्यांच्यामागून येत असलेले शेतकरी जनार्दन धांडे व […]

धोबी परीट समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करा !

जळगाव : प्रतिनिधी धोबी परीट समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करा, अशी मागणी समाजातर्फे करण्यात आली आहे. धोबी परिट समाजाला पुर्ववत अनुसूचित जातीमध्ये समाविष्ठ करण्यात यावे, धोबी समाज १९६० पूर्वी भंडारा व बुलढाणा जिल्हा अनुसूचित जातीच्या शासकीय आदेशामध्ये आहे. हे पुराव्यानिशी सिध्द झालेले आहे. तरी धोबी परिट समाजाला न्याय देण्यात यावा, डॉ. डी. एम. भांडे समितीच्या […]

कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित फायदे मिळणार !

आजचे राशीभविष्य दि. ११ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज तुम्ही जमीन किंवा घर खरेदी करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित फायदे मिळतील. स्थलांतराची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. सगळं तुमच्या मनासारखं होईल. वृषभ राशी तुमच्या कुटुंबातील वातावरण शांततापूर्ण असेल. तथापि, विविध कारणांमुळे काही समस्या उद्भवू शकतात. तुमची सार्वजनिक प्रतिमा तुमच्यासाठी अनुकूल असेल. […]

error: Content is protected !!