मोठी बातमी : कॉंग्रेसचे नेते पटोले भाजपच्या वाटेवर ? राज्यात मोठी चर्चा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांसह कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेत असताना आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. पण भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. नाना पटोले यांच्या व्यक्तिमत्त्वार असा संशय निर्माण करण्यात […]
गुजरातनंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होणार मोठे बदल !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे घेत राजकीय भूकंप घडवल्यानंतर, आता शेजारच्या महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये या घडामोडींमुळे तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ ५ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण करत आहे. त्या निमित्ताने ते आपल्या […]
रक्षकच झाला भक्षक : चार वेळा पोलिसाने केला अत्याचार : महिला डॉक्टरने सुसाईट नोट लिहून संपविले आयुष्य !

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराजाच्या घटना सातत्याने वाढत असताना आता सातारा जिल्ह्यातील फलटण येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. डॉ. संपदा मुंडे असे या डॉक्टरचे नाव असून जीवन संपवण्यापूर्वी डॉक्टरने हातावर सुसाईड नोट […]
बेवारसांचे झाले वारस : कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी अंघोळ घालून दिल्या भेटवस्तू !

जळगाव : प्रतिनिधी ऐन दिवाळी सणात बेवारस रुग्णांना एकटेपणाची भावना वाटू नये, कुटुंबीयांची आठवण येऊ नये म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कक्ष क्रमांक १३ येथे बेवारस रुग्णांची स्वच्छता करून कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. या कृतीचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांचेसह उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, अतिरिक्त वैद्यकीय […]
संतापजनक : चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीला संपविले !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यासह अनेक ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात घडत असताना परिवारातील पती-पत्नीमध्ये देखील हमरीतुमरी होवून मोठ्या वादात रुपांतर होत असते आता पतीची दिवाळीच्या दिवशीच हत्या केल्याची धक्कादायक घटना ही पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. चारित्र्यावर वारंवार संशय घेतल्याने पती-पत्नीत सारखा वाद व्हायचा. कालच दिवाळीचा शेवटचा दिवस होता, तरी त्यांच्यात आधी संध्याकाळी आणि मग […]
रेकॉर्डवरील आरोपींकडे आढळले दोन वठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे !

भुसावळ : प्रतिनिधी शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रेकॉर्डवरील आरोपींवर लक्ष ठेवण्याच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विजय नेरकर, राजेश काळे, जावेद शहा, पंकज तायडे, सुनिल सोनवणे आणि […]
धावत्या बसने घेतला पेट अन १२ जणांचा गेला जीव !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षासापून महामार्गावरील बसमुळे अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडत असताना आता दिवाळीचा उत्साह सुरु असताना आंध्र प्रदेशातील कुरनूल येथील चिन्नाटेकुरजवळ एका खाजगी बसला आग लागली. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात १२ प्रवासी जिवंत जळाले. ही घटना शुक्रवारी पहाटे ३:३० च्या सुमारास घडली. एनएच-४४ वर बस एका दुचाकीला धडकली. […]
तुम्ही एखाद्याला उधार दिलेले पैसे अचानक परत मिळू शकतात

आजचे राशिभविष्य दि.२४ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज, ऑफिसमध्ये फोन कमी वापरा आणि तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा, अन्यथा संकटात सापडाल. आर्थिक बाबींमध्ये लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळा. आई-वडीलांच्या आशीर्वादाने जुनी , अडकलेली कामं पूर्ण होतील. वृषभ राशी व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध […]