September 21, 2026 7:34 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

नशिराबादनजीक भीषण अपघात : बस प्रवाशी महिलेचा जागीच मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमळनेर आगाराची बस जळगावकडून भुसावळकडे जात असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बस नशिराबाद टोल नाक्याजवळून जात असताना अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर भरधाव वेगात फुटले. त्यामुळे […]

जळगाव जिल्ह्यांत उपकरणे पडण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन !

जळगाव : प्रतिनिधी भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हैदाराबाद येथून सुमारे १० उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. ही उड्डाणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल, हैद्राराबाद-५०००६२ येथील बलून सुविधा केंद्रातून केली जाणार आहेत. ही […]

मोदी सरकारची मोठी घोषणा ; लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना दिलासा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने मंगळवारी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून या निर्णयामुळे देशभरातील सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, हा आयोग पुढील १८ महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करेल. आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू […]

मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय : शरद पवारांसह अजित पवारांच्या संस्थेची होणार चौकशी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात महायुती सरकारचे मुख्यमंत्री फडणवीसणांच्या अनेक महत्वाचे निर्णय घेतल्यानंतर आता त्यांच्या एका निर्णयाची जोरदार चर्चा होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी असलेल्या एका संस्थेच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे काका पुतण्याची कोंडी करण्याचा प्रयत्न […]

“महिलांच्या उज्ज्वल भविष्याची खात्री देणाऱ्या ५ बचत योजना”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील महिला केवळ घर किंवा कुटुंबापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या त्यांच्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. योग्य गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन करणे हे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल आहे. अशा परिस्थितीत, काही विशिष्ट गुंतवणूक योजना महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात, ज्या केवळ सुरक्षित नाहीत तर चांगला परतावा देखील […]

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ! माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरी

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील चोरट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, राजकीय नेत्यांची घरेसुद्धा सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवराम […]

खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड लांबविली !

जळगाव : प्रतिनिधी घरातील सदस्य जेजुरी येथे देवदर्शनाला गेलेले असताना खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ४० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण ६६ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवार दि.२६ रोजी घानवड येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील […]

कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात : ५ जण जखमी !

अमळनेर : प्रतिनिधी जानवे रस्त्यावर सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कार (एमएच १४ एफएम ६५९९) जानवे रस्त्यावरून जात असताना अचानक टायर फुटल्याने गाडीचा तोल जाऊन ती रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात ललित जीवन महाजन (४३), अपर्णा ललित महाजन (४०), डॉ. कुणाल चौधरी (३७), मित […]

चोपडा पोलिसांची मोठी कारवाई : रस्ता लुटीच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांना अटक !

चोपडा : प्रतिनिधी शहरा बाहेरील शिरपूर बायपासजवळील रणगाडा चौकात मध्यरात्री सुमारे २:३० वाजेच्या सुमारास रस्ता लुटीच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीपसिंग हरिसिंग पवार (३६, नांदेड), विक्रम बाळासाहेब बोरगे (२४, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर), अनिकेत बालाजी सूर्यवंशी (२५, नांदेड), अमनदीपसिंग अवतारसिंग राठोड (२५, नांदेड), सद्दाम हुसेन मोहम्मद अमीन (३३, नांदेड), […]

आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक घटना घेऊन येणारा आहे.

आजचे राशिभविष्य दि. २८ ऑक्टोबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्याचा आणि धाडसाचा आहे. आज तुमच्यात वेगळाच उत्साह असेल. ज्यामुळे कामामध्ये गती येईल. कामानिमित्त लांबचे प्रवास संभवतात. हे प्रवास फलदायी ठरतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक घटना घेऊन येणारा आहे. वाहने आणि द्रुतगती प्रवासाची विशेष आवड राहील. वृषभ राशी वृषभ राशीसाठी आज अचानक […]

error: Content is protected !!