September 21, 2026 8:50 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; एरंडोल तालुक्यासह परिसरात खळबळ !

जळगाव, दि. ३ : जळगाव जिल्ह्यातील गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. एरंडोल तालुक्यातील कढोली गावात झालेल्या या गोळीबारात ३१ वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कढोली गावातील हा तरुण एका खाजगी कंपनीत काम करत असून उद्या पारोळा […]

‘मुक्ताई’ बंगल्यावर चोरी : तीन चोरट्यांसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त !

जळगाव : प्रतिनिधी  रामानंद नगर पोलिसांनी माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांच्या शिवराम नगर येथील ‘मुक्ताई’ निवासस्थानी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा केला असून, पोलिसांनी तिघांना अटक करून सुमारे ६ लाख ४५ हजार रुपयांचा सोन्या–चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, ही घटना २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते २८ ऑक्टोबर सकाळी ८ वाजेच्या दरम्यान […]

बार कौन्सिलचा मोठा निर्णय : असीम सरोदे यांची सनद रद्द !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सोमवारी सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करून त्यांना जोरदार झटका दिला. असीम सरोदे हे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. पण आता त्यांची सनद रद्द झाल्यामुळे त्यांना या प्रकरणात कोणताही युक्तिवाद करता येणार […]

जळगावात पत्रकारावर दूचाकीवरुन आलेल्या तिघांनी केला हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी वृत्तपत्राच्या कार्यालयात जात असलेल्या पत्रकारावर दूचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन जणांनी बियरची रिकामी बाटली मारुन गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील बळीराम पेठ परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका वृत्तपत्रामध्ये वरीष्ठ पत्रकार […]

शॉक लागल्याने दीड वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू !

पारोळा : प्रतिनिधी शहरातील शिव कॉलनी परिसरात दीड वर्षाचा बालक पोर्चमध्ये खेळत असताना इलेक्ट्रिक स्कूटर चार्जरचा शॉक लागल्याने बाळाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील प्रतापसिंह राठोड रा. शिव कॉलनी, पारोळा यांची मुलगी शुभांगी दिवाळीनिमित्त आई-वडिलांकडे आलेली होती आज दि. २ रोजी सहा वाजेच्या सुमारास […]

एमआयडीसी परिसरात गोळीबार : दारू विक्रेत्याकडून दोन कामगारांवर प्राणघातक हल्ला

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरासह परिसरातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे गेल्या काही दिवसापासून समोर येत आहे. आता पुन्हा एकदा शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसी कंपनीच्या बाहेर अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्याकडून कंपनीतील कामगारांवर गोळीबार झाल्याची घटना रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास घडली. यात राजन शेख रफिउल्ला (वय २०) आणि अहेमद फिरोज शेख […]

खळबळजनक : एकाच गावातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरीत्या बेपत्ता !

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून तीन अल्पवयीन मुली एका रात्रीत रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत भडगाव पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना १९ रोजी रात्री घडली. या मुलींना फसवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात सावत्र बहिणी आणि त्यांच्या गल्लीत […]

पैशाच्या वादातून मुलाने घेतला बापाचा जीव !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील अंतुर्ली येथे पैशाच्या वादातून व्यसनी मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडका घालून त्याचा खून केला. ही घटना अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटजवळ घडली. यातील आरोपीस रविवारी सकाळी अंतुर्ली परिसरातील एका शेतातून अटक करण्यात आली आहे. जगदीश दामू तायडे (६०), असे खून झालेल्या पित्याचे तर गणेश […]

या राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस त्यांच्या बाजूने असेल. त्यांना नशीब साथ देईल.

आजचे राशिभविष्य दि ३ नोव्हेंबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस त्यांच्या बाजूने असेल. त्यांना नशीब साथ देईल. व्यवसायात अनपेक्षित आर्थिक फायदा होऊ शकतो. कोणाकडूनही पैसे उधार घेणे टाळा. जोडीदाराच्या मदतीने कौटुंबिक वाद दूर होतील. नातेसंबंध सुधारतील. कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घ्याल. त्यामुळे मुले आनंदी राहतील. जुन्या मित्राची भेट फायदेशीर ठरेल. गुंतवणूक करताना सावधगिरी […]

error: Content is protected !!