२ फॉर्च्यूनर, २ थार, ७ ट्रॅक्टर बक्षीसात : बैलगाडा शर्यतीची राज्यभर चर्चा !

सांगली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात दाखल झालेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आता राजकारणासोबतच खेळाच्या मैदानावरही लक्ष वेधून घेतले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वात तासगावजवळ येत्या 9 नोव्हेंबर रोजी भव्य बैलगाडी शर्यतीचे आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. […]
महायुती सरकारचा मोठा निर्णय : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचार मर्यादा दुप्पट : 10 लाखांपर्यंत मोफत मदत !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. या योजनेत आता विविध प्रकारच्या तब्बल 2,400 आजारांसाठी उपचारांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 2,399 आजारांसाठी राज्यातील नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. तसेच, ज्या काही गंभीर आजारांसाठी अधिकचा खर्च होत आहे, त्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचा […]
विकासावर भाषण दाखवा अन् हजार रुपये मिळवा ; मुख्यमंत्र्यांचा टोला !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत. त्याचा मला आनंद आहे. पण ते टोमणे मारण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी […]
चुनार रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात : गंगास्नानासाठी आलेल्या सात भाविकांचा रेल्वेखाली मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तरप्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण रेल्वे अपघातात सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी आलेले हे सर्व भाविक रुळ ओलांडत असताना हरियाणातील कालका येथून हावडा दिशेने वेगाने धावणाऱ्या कालका एक्सप्रेस गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून स्थानिक […]
उद्धव ठाकरे यांचा ‘दगाबाज रे’ संवाद दौरा : शेतकऱ्यांशी थेट संवाद, सरकारवर कर्जमाफीसाठी दबाव

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकतीच स्थानिक निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून मराठवाड्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे. “दगाबाज रे” या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ठाकरे शेतकऱ्यांच्या अडचणी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेत आहेत. या दौऱ्याचा उद्देश म्हणजे — शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर झालेल्या […]
पावसाने नवीन कांदा हवालदिल; जुन्यालाही मिळत नाही भाव !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागांत सध्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्याचा फटका नवीन लाल कांद्याला बसत असल्याने या कांद्याचा हंगाम एक ते दीड महिना लांबणीवर पडला आहे. सध्या साठवणीत असलेला जुना कांदा बाजारात दाखल होत आहे. या कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे एकीकडे नवीन पिकाचे नुकसान, तर दुसरीकडे जुन्या कांद्याला […]
जळगावात गोळीबार करणारे दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात : एकाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातील अवैध दारूच्या अड्ड्यावर रविवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणात संशयित हल्लेखोर राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय ३५) आणि त्याची पत्नी मोनाली राहुल बऱ्हाटे (वय ३०, दोघे रा. रामेश्वर कॉलनी) यांना पोलिसांनी नांदूर गावाजवळून पकडले. या घटनेत एक कामगार ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील फिरोज शेख, राजन […]
नफा मिळवून देण्याचे आमिष : डॉक्टराची झाली लाखो रुपयात फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी ऑनलाइन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि फेसबुकवरून ओळख वाढवून एका सायबर गुन्हेगाराने अमळनेर येथील एका डॉक्टरची तब्बल २७ लाख ९५ हजार ६३० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉक्टरांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील ४८ वर्षीय डॉक्टर हे फेसबुकवर नियमित […]
तुमच्या व्यवसायात तुम्हाला कुटुंबाकडून काही प्रमाणात सहकार्य मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.५ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज तुम्ही धीर ठेवा आणि संयमाने वागाल तर कठीण समस्यांवरही सहज उपाय सापडतील. कौटुंबिक कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. दिवस धावपळीचा जाईल. वृषभ राशी तुम्हाला घर आणि ऑफिसच्या जगातून बाहेर जाऊन निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटेल. जुन्या मौल्यवान वस्तूंसाठी सौदेबाजी केल्याने तुम्हाला फायदा होईल. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी देखील […]