मंत्री महाजनांचा बालेकिल्ला अजून भक्कम; जामनेरमध्ये साधना महाजन बिनविरोध !

जामनेर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असताना, जामनेर नगरपरिषदेने भाजपच्या खात्यात पहिला मोठा विजय जमा केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने स्थानिक राजकारणात भाजपवरचं वर्चस्व अधोरेखित झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक दावे–प्रतिदावे होत होते. […]
नैसर्गिक शेतीला मोठी चालना : पीएम-किसानचा १८,००० कोटींचा हप्ता जाहीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची जैवविविधता वाढत असून तरुण पिढी शेतीकडे आधुनिक व विस्तारित संधी म्हणून पाहू लागली आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि भारत नैसर्गिक शेतीचे जागतिक केंद्र बनेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. तामिळनाडूतील कोयंबतूर येथील कोडिसिया हॉलमध्ये दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत […]
महायुतीत नाराजी : उद्धव ठाकरेंचा शिंदे यांच्यावर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये नाराजी सुरु असल्याने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा खरपूस समाचार घेतला. सध्या सत्ताधारी महायुतीत एकमेकांच्या नसा आवळण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे एक कुणीतरी गेलंय, बाबा मला मारले म्हणून दिल्लीला. या दिवट्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही, असे […]
कारण, माणूस जिवंत परत आला तर नशीब : माजी मुख्यमंत्री चव्हाण !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या तीन महिन्यापासून आजारपणामुळे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहिल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये परतले आहेत. कराडमध्ये दाखल झाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीचा त्यांनी दोन दिवस आढावा घेतला. त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पूर्वी सक्रिय होतोच, पण आता जास्त काळ मुंबईत सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामानानुसार दिल्लीलाही जाईन. कारण, […]
खळबळजनक : गवळीवाडा परिसरात आढळला तरुणाचा मृतदेह !

जळगाव : प्रतिनिधी रात्री बाहेरगावाहून आल्यानंतर कारमध्ये झापलेले सोनू देवराम पाटील (वय ३०, रा. शिवाजीनगर) यांचा मृतदेह कारमध्ये मृतदेह मिळून आला. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास गवळीवाडा परिसरात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गवळीवाडा परिसरात रात्रीपासून एक कार रस्त्याच्या कडेला उभी […]
साधूच्या वेषात भामटे : वृद्धाची अंगठी लंपास, नागरिकांनी दोघांना धोपटले

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मानराज पार्क परिसरात बुधवारी सायंकाळी साधूच्या वेशात आलेल्या दोन भामट्यांनी बोलण्यात गुंतवून ठेवत एका वृद्धाच्या बोटातील सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. काही वेळातच सत्य लक्षात आल्यानंतर वृद्धाने त्या दोघांचा शोध घेऊन अंगठी परत मिळवली. संतप्त नागरिकांनी या दोघांना चोप देत रामानंद नगर पोलिसांच्या हवाली केले. मिळालेल्या माहितीनुसार, मानराज पार्कजवळ […]
एकाच रात्री दोन ठिकाणी धाडसी घरफोडी !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कडगाव येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी होऊन रोख २२ हजार रुपयांसह सोन्याचे दागिने, असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कडगाव येथील किरण मोतीराम पाटील (६३) यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी […]
राजस्थानात नातेवाइकाच्या घरी गेले असताना जळगावात चोरट्यांनी फोडले घर !

जळगाव : प्रतिनिधी राजस्थानात नातेवाइकाचे निधन झाल्यामुळे तेथे द्वारदर्शनासाठी गेलेल्या मालचंद गौरीशंकर सोनी यांच्या घरातून चोरट्यांनी रोख ५० हजार रुपयांसह १५ लाख २० हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी गीताईनगरात सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, सुवर्ण कारागीर […]
कोणीतरी तुमची अधिकृत माहिती लीक करू शकते. तुमच्या कामात काळजी घेणे आवश्यक आहे.

आजचे राशिभविष्य दि.20 नोव्हेंबर 2025 मेष राशी आज, तुम्हाला तुमच्या कामासाठी एक नवीन कल्पना सुचू शकते आणि तुम्ही लवकरच ते काम सुरू करू शकता. तुम्हाला मालमत्तेसाठी चांगला सौदा मिळू शकतो. वृषभ राशी आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या प्रियकराशी तुमचे संबंध चांगले असतील. मिथुन राशी […]