उड्डाणपुलावर भीषण अपघात ; चार ठार, तिघे गंभीर जखमी !

ठाणे : वृत्तसंस्था शुक्रवारी संध्याकाळी अंबरनाथ शहरातील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना उड्डाणपुलाशेजारील इमारतीवर बसवलेल्या सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६:४२ च्या सुमारास कार चालवत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे नियंत्रण सुटलेली कार रस्त्यावरून भरधाव वेगाने […]
चुलतीने माघार घेत पुतणीला साथ; स्नेहा तमशेट्टे यांची अनपेक्षित बिनविरोध निवडणूक चर्चा

नांदेड : वृत्तसंस्था राज्यात सध्या स्थानिक निवडणुकीची धामधूम सुरु असून राज्यातील २४६ नगपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुका होण्याअगोदरच अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली आहे. अशातच आता नांदेड जिल्ह्यातील मुखेड नगरपरिषद निवडणुकीतून एका तरुणीची नगरसेवक पदी अवघ्या २१ व्या वर्षी बिनविरोध निवड झाली आहे. या तरुणीचे नाव स्नेहा तमशेट्टे असून तिने नगरसेवक पदी झालेल्या बिनविरोध […]
भरधाव क्रुझर पलटी होवून भीषण अपघात : तीन महिलांचा जागीच मृत्यू !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील सोलापूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर अणदूर (ता.तुळजापूर) येथील चिवरी पाटी येथे क्रुझर (एम एच २४ व्ही ४९४८) गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात ३ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर सात ते आठ प्रवासी जखमी झाले. ही घटना आज (दि. २२) सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील साक्षी बडे, सोनाली कदम, पूजा शिंदे […]
मराठा समाजाला आरक्षणाची गरज कशासाठी : पुढील सुनावणी 11 डिसेंबरला !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षांपासून राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू असून आता मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग या गटाखाली दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या वैधतेबाबत दाखल याचिकेवर आज सविस्तर सुनावणी झाली. महाराष्ट्रासह सर्वच स्तरांवर या प्रश्नावर मोठी चर्चा सुरू असताना, न्यायालयातील आजची प्रक्रिया […]
“भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये शिंदे गटाला फटका? ३५ आमदार जाणार भाजपात : ठाकरे गटाचा धडाकेबाज दावा!”

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटातील तब्बल 35 आमदार भाजपत जाणार असल्याचा गंभीर दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला आहे. भाजपनेच तयार केलेला पक्ष आता भाजपच संपवणार असल्याचा आरोप करून ठाकरे गटाने शिंदेंवर थेट निशाणा साधला आहे. ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून म्हटले आहे […]
ट्रकमधून ६१ सिलेंडरची चोरी : एमआयडीसी पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातून ६१ नग गॅस सिलेंडर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात चोरी करणारे दोन आरोपी त्यांच्या गुन्ह्यात वापरलेल्या आयशर वाहनासह जेरबंद करण्यात आले आहेत. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर रोजी भारत पेट्रोलियम […]
जळगावातील वृद्धाची फसवणूक : रेल्वेत नोकरी लावण्यासाठी घेतले १२ लाख रुपये !

जळगाव : प्रतिनिधी रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका ६७ वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरुवारी २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी संतोष माणिक चौधरी (वय ६७, रा. निमखेडी शिवार, जळगाव) […]
व्यवसायाचा विस्तार कराल. आवडत्या गोष्टीचा अभ्यास करण्यात वेळ जाईल. तुम्हाला आनंद मिळेल.

आजचे राशिभविष्य दि.२२ नोव्हेंबर २०२५ मेष राशी व्यवसायाचा विस्तार होईल, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे, आयुष्यात किरकोळ चढ-उतार होतील. तुम्हाला वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही प्रॉपर्टीबाबत महत्त्वाचे निर्णय घ्याल. वृषभ राशी गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेल्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊ शकतात, परंतु परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. […]