पुण्यातील कंपनीकडून कपात केलेला TDS न भरल्याची तक्रार; कर्मचाऱ्याच्या आर्थिक सुरक्षेला तडा !

जळगाव : प्रतिनिधी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेला कर वेळेवर शासनाकडे जमा करणे ही प्रत्येक कंपनीची कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, जळगाव येथील एका कर्मचाऱ्याने अशा गंभीर प्रकाराची तक्रार संबंधित विभागाकडे दाखल केली आहे. पुणे येथील बाणेर परिसरातील एका कंपनीने कर्मचाऱ्याच्या पगारातून TDS कपात करून तो शासनाकडे न भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या […]
समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक; शरद पवारांची रुग्णालयात धाव

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार चळवळीचे प्रतीक मानले जाणारे डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत मधूनमधून चढ-उतार होत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. यामुळे सामाजिक क्षेत्रात […]
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत!” पवार–जगताप भेटीनंतर महापालिका रणनिती स्पष्ट !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुती स्वबळावर लढली. मात्र, या निवडणुकांत महाविकास आघाडीचे अस्तित्व उरले आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक निवडणुकीत विचित्र प्रकाराच्या आघाड्या आणि युत्या झाल्या. पण चर्चा ही सर्वात जास्त महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली. या निवडणुकीनंतर आता सर्वांना महापालिका निवडणुकांचे वेध […]
अयोध्येहून परतणाऱ्या जळगावच्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, 30 जखमी

धरणगाव : प्रतिनिधी अयोध्या दर्शनावरून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला अयोध्या-प्रयागराज महामार्गावरील सुलतानपूरजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिंप्राळा (जळगाव) येथील छोटीबाई पाटील यांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 भाविक जखमी झाले आहेत. धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ येथील सुमारे तीस महिला व पाच पुरुष असा भाविकांचा ग्रुप अयोध्येसह परिसरातील तीर्थदर्शनासाठी गेला होता. त्यांच्यासोबत जळगाव येथील काही […]
महापरिनिर्वाण दिनापूर्वी ‘भव्य स्मारक’ साकारण्याची स्पीड मोहीम : मुख्यमंत्र्यांची माहिती !

मुंबई : वृत्तसंस्था इंदू मिल परिसरात उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक येत्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, स्मारकाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले असून सर्वात महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या पुतळ्याच्या उभारणीस […]
लहान पाखराचं मोठं उड्डाण : वेदा सरफरेची जलतरण कामगिरी देशभरात गाजली

रत्नागिरी : वृत्तसंस्था अवघी नऊ महिन्यांची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणार्या रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील वेदा परेश सरफरे हिचा प्रवास आता फक्त 1 वर्ष 9 महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत पोहचला आहे. 100 मीटरचे अंतर 10 मिनिटे आणि 8 सेंकदात पूर्ण करत वेदा भारतातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे. वेदाचा मोठा […]
टायर फुटल्याने ओमनी गाडी उलटली : ८ जण जखमी !

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील आडगाव फाट्याजवळ ओमनीचे पुढील टायर फुटल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात ८ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील आडगाव फाट्याजवळ ५ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ओमिनी गाडी (एमएच ०५, एक्स २९२६) चे पुढील टायर अचानक फुटले. यामुळे गाडी उलटली. – या अपघातात चाळीसगाव तालुक्यातील करमूळ येशील […]
फसवणूक : शेअर्स ट्रेडिंगचे दिले आमिष : एकाची तब्बल १९ लाखांत फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी ऑनलाइन शेअर्स ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भुसावळ येथील एका नागरिकाची १९ लाख रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक फसवणूक करण्यात आली. नत्थू प्रजापती प्रसाद (वय ४९, रा. भुसावळ) यांनी यासंबंधी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी नत्थू प्रसाद यांच्या तक्रारीनुसार, ९ ऑगस्ट २०२५ ते २४ नोव्हेंबर या दरम्यान ही […]
चोरट्यांची हिम्मत वाढली : थेट नायब तहसीलदारांची दुचाकी चोरली !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील विश्वधारा अपार्टमेंटमध्ये उभी ठेवलेली नायब तहसीलदार अभिमन्यू विलास चहाटे (वय ३८, रा. विश्वधारा अपार्टमेंट) यांची दुचाकी चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चहाटे हे ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी यावल येथून ड्यूटी करून घरी आले. त्यांनी आपली होंडा शाईन मोटारसायकल […]
नियोजन करण्यासाठी आणि महत्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला राहणार !

मेष राशी आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुम्हाला तुमच्या भविष्यातील योजनांवरही विचार करावा लागेल. कुटुंबातील सदस्य तुमची ध्येये साध्य करण्यास मदत करतील. वृषभ राशी आज तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नियोजन करण्यासाठी आणि महत्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमचे पूर्ण लक्ष तुमची कामे पूर्ण करण्यावर केंद्रित कराल. मिथुन राशी आज […]