बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा विहिरीत मृत्यू; तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात

जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावातून शाळेतून घरी परतत असताना रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा मृतदेह तब्बल चार दिवसांच्या शोधानंतर गावालगतच्या एका विहिरीत आढळून आल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुमारे ६० ते ७० तास चाललेल्या शोधमोहिमेचा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला. धनश्री शिंदे […]
भडगाव हादरले : शाळेच्या निष्काळजीपणामुळे नाल्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू !

भडगाव : प्रतिनिधी भडगाव शहरातील आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी (दि. १६ डिसेंबर) सकाळी अत्यंत हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीवरून तोल जाऊन ही दोन्ही बालके जवळील नाल्यात पडली असून पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण […]
प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस : जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

जळगाव : प्रतिनिधी देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती व खान्देशच्या कन्या आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिमो स्व. दादा सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे रक्तदान शिबिर शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता […]
मथुरात पहाटे भीषण अपघात : बसांना आग, ४ ठार तर २५ प्रवासी जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील मथुरा येथे दिल्ली–आग्रा (यमुना) एक्सप्रेसवेवर मंगळवारी पहाटे सुमारे ४ वाजता दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला. बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात बस एकामागोमाग आदळल्या. धडकेनंतर काही बसना आग लागल्याने परिसरात घबराट पसरली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कमी दृश्यमानतेमुळे एका बसचा […]
सुप्रिम कॉलनीत ४९ हजारांचा ऐवज लंपास; दोघा सराईतांना अटक

जळगाव : प्रतिनिधी मुलाच्या लग्नासाठी चाळीसगाव येथे गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत घडली. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि. १३ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरिफ […]
वीजमिटरच्या कामासाठी लाचखोरी उघड : महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात !

जळगाव : प्रतिनिधी नवीन वीजमिटर बसविण्यासाठी आधी चार हजार रुपयांची लाच घेऊनही काम न केल्याने चौकशीसाठी गेलेल्या डॉक्टरकडून पुन्हा दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवार, दि. १५ डिसेंबर रोजी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आत्माराम धना लोंढे (वय ५७, पद – वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण) […]
निमखेडीतील ‘त्या’ तरुणाचा खून अनैतिक संबंधांतूनच !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील निमखेडी येथील सागर साहेबराव सोनवणे (३०) या तरुणाचा अनैतिक संबंधाच्या वादातून खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर (दोघे रा. निमखेडी) या दोन जणांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, सागर सोनवणे याचे चार वर्षापासून एका महिलेसोबत अनैतिक […]
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात

आजचे राशिभविष्य दि.१६ डिसेंबर २०२५ मेष राशी उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे, गुड न्यूज मिळेल. आज तुम्हाला तुमच्या धाकट्या भावाकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या जोडीदारासोबतचे झालेला वादमिटवा, घरात शांतता नांदेल. वृषभ राशी या राशीच्या आर्किटेक्टसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. शेतकऱ्यांना आज काही फायदे मिळू शकतात. त्यांना […]