खळबळजनक : जळगावात कुंटणखान्यावर छापा; महिला चालकासह तिघे ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कुंटणखान्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा खुलासा केला आहे. या कारवाईत कुंटणखाना चालवणारी एक महिला आणि दोन पुरुष अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळी पाच पीडित व्यक्ती आढळून आल्या आहेत. एमआयडीसी परिसरातील नीलंबरी हॉटेलच्या मागे व हॉटेल सुमेरसिंगच्या समोर असलेल्या एका ठिकाणी अवैध […]
जळगाव जिल्ह्यात 16 ते 30 डिसेंबर दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश जारी !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी तसेच ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे प्रतिबंधात्मक आदेश दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 00.01 वाजेपासून ते […]
दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याने धनंजय मुंडेंच्या पुनरागमनाच्या चर्चेला उधाण !

जळगाव : प्रतिनिधी सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कोकाटेंवर अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता असून, अटक झाल्यास त्यांचे मंत्रिपद जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताकारण तापले असून, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाची […]
जळगावात पाच दिवसीय स्वयंरोजगार कार्यशाळेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

जळगाव : प्रतिनिधी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्याच्या ध्येयाने आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय स्वयंरोजगार कार्यशाळेला जळगाव शहर व परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेमध्ये तब्बल १,००० हून अधिक महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यशाळेमध्ये महिलांना सुगंधित मेणबत्ती निर्मिती, फिनाइल तयार करणे, डिश […]
माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या; नाशिक न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी अडचणीत आलेले राज्याचे क्रीडामंत्री तथा निफाडचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांच्या अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायमूर्ती रुपाली नरवडीया यांनी हा आदेश दिला. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप याचिकाकर्त्या ॲड. अंजली […]
जळगावमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी; जागावाटपावरून मतभेद..!

जळगाव : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपावरून गंभीर मतभेद उफाळले आहेत. ठाकरे गटाने अपेक्षित जागा न दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडीच्या बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 10 वाजता पक्षाच्या कार्यालयात निरीक्षक जयसिंगराव गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा नेत्यांची बैठक होणार असून त्यात निवडणुकीसाठी पुढील दिशा ठरविली जाणार आहे. […]
जिल्हा रुग्णालयात प्रशासकीय फेरबदल; डॉ. पाटील यांची बदली, सांगळे यांची नियुक्ती

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकीत्सक डॉ. किरण पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी धुळे येथील स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. स्वप्निल विजयराव सांगळे यांना पदोन्नती देवून बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाचे क उप-सचिव दीपक केंद्रे यांनी मंगळवार दि. १६ रोजी सायंकाळी काढले. गेल्या पाच वर्षांपासून डॉ. किरण पाटील हे जिल्हा सामान्य […]
महिलेला घर शोधणे पडले महागात : लाखों रुपयांची झाली फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी ऑनलाइन अॅपवर घर (फ्लॅट) शोधणे चितोडा येथील महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या ठगाने यावल तालुक्यातील चितोडा गावातील २९ वर्षीय महिलेला तब्बल २ लाख ३८ हजार ३९९ रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. या गंभीर फसवणुकीप्रकरणी सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
घटस्फोट प्रकरण न्यायालयात : तरी विवाहमंडपात दुसरे लग्न रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद !

जळगाव : प्रतिनिधी घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असतानाच पतीने बनावट घटस्फोटाचे दस्तऐवज सादर करून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पहिल्या पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह त्याची दुसरी पत्नी आणि नातेवाईक, सहकारी अशा एकूण नऊ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिवकॉलनी येथे राहणाऱ्या वैशाली स्वप्नील चौधरी […]
आज तुमचे मित्राशी मतभेद होऊ शकतात. इतरांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता खात्री करून घ्या मगच निर्णय घ्या.

आजचे राशिभविष्य दि.१७ डिसेंबर २०२५ मेष राशी व्यवसाय करणाऱ्यांनी आज कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी इतरांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या योजनांमध्ये शेवटच्या क्षणी बदल देखील होऊ शकता. घरात जोडीदाराशी वाजू शकतं, रात्री बाहेर जेवायला जा, संवादाने प्रॉब्लेम्स सुटतील. वृषभ राशी आज तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. कपड्याच्या व्यवसायात असलेल्यांसाठी […]