September 27, 2026 4:26 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

यावलमध्ये भाजपाला नकार; उबाठा गटाच्या छाया पाटील नगराध्यक्षपदी दणदणीत विजय

यावल : प्रतिनिधी यावल नगरपालिकेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट नकार देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजयी केले आहे. भाजपच्या उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे यांचा सुमारे पाच हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. यावल नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र […]

नशिराबाद नगरपालिकेवर भाजप-शिवसेनेची आघाडी : योगेश पाटील नगराध्यक्षपदी !

जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, नगरपालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर शिवसेना, अपक्ष तसेच इतर पक्षांनाही प्रतिनिधित्व मिळाले आहे. नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे पाटील योगेश नारायण (पिंटू शेठ) यांची निवड झाली आहे. नगरसेवक पदासाठी एकूण २१ सदस्य […]

वरणगावात प्रस्थापितांना जोरदार धक्का; अपक्ष सुनील काळे भरघोस मतांनी विजयी

जळगाव : प्रतिनिधी वरणगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रस्थापितांना जोरदार धक्का बसला असून, अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासूनच आघाडी घेत मुसंडी मारल्याचे दिसून आले. एकूण २१ जागांपैकी भाजपचे १४ उमेदवार विजयी झाले असून, […]

धरणगावात ठाकरे गटाचा दणदणीत विजय; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का

जळगाव : प्रतिनिधी  धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाला जबरदस्त धक्का बसला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या उमेदवार लिलाबाई सुरेश चौधरी यांनी स्पष्ट बहुमतासह दणदणीत विजय मिळवला आहे. लिलाबाई चौधरी यांनी प्रत्येक फेरीत आघाडी राखत अखेर निर्णायक विजय मिळवत धरणगाव नगरपालिकेवर ठाकरे गटाची सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत महायुतीकडून वैशाली […]

खडसे कुटुंबाला धक्का; संजना पाटील विजयाच्या उंबरठ्यावर !

मुक्ताईनगर : वृत्तसंस्था भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का बसला असून, शिवसेना (शिंदे गट) कडून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना चंद्रकांत पाटील या विजयाच्या मार्गावर आहेत. सध्याच्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये संजना पाटील यांनी तब्बल २,५८३ मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला […]

राज्यातील नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकांत महायुतीची मुसंडी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या एकूण 288 जागांसाठी आज मतमोजणी सुरू झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र आहे. यामध्ये नगरपरिषदांच्या 246 आणि नगरपंचायतींच्या 42 जागांची मोजणी सुरू आहे. सध्याच्या कलानुसार महायुती तब्बल 195 जागांवर आघाडीवर असून, महाविकास आघाडी केवळ 47 जागांवर आघाडीवर आहे. भाजप सर्वाधिक 111 जागांवर आघाडीवर असून, शिंदे गट […]

१५ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार : परप्रांतीय तरुणाचा कारनामा !

जळगाव : प्रतिनिधी  कामानिमित्त जळगावात आलेल्या परप्रांतीय तरुणाने कामाच्याच ठिकाणी ओळखीचा गैरफायदा घेत १५ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहा महिन्यांपासून निमखेडी शिवारात सुरू होता. या विषयी कोणाला काही सांगितल्यास मुलीला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या प्रकरणी अत्याचार करणारा मुकेश साकेत (रा. दमोय, जि. उमरिया, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा […]

कपडे विक्रीसाठी जातांना भरधाव वाहनाच्या जबर धडकेत व्यावसायिक ठार !

कपडे विक्रीसाठी आसोदा येथे जात असताना भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे नंद साबणदास जगिया (वय ६८, रा. भुसावळ) हे जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास बायपासजवळील असोदा सर्व्हिसरोडवर घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील सिंधी कॉलनीत नंद जगिया यांचा कापड व्यवसाय असून ते […]

आज आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वात काही बदल करावे लागतील

आजचे राशिभविष्य दि.२१ डिसेंबर २०२५ मेष राशी आज, तुमच्या आंतरिक शक्तीमुळे कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कलांमध्ये रस असलेल्यांना हा दिवस अनुकूल वाटेल. तुमच्या कलेची प्रशंसा देखील होऊ शकते. वृषभ राशी आज तुम्ही नवीन व्यवसायाची योजना देखील आखाल. महत्वाच्या निर्णयामध्ये तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही मित्रांसोबत लांबच्या […]

error: Content is protected !!