September 27, 2026 4:26 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

ठाकरे बंधूंची युती होताच मनसेला खिंडार : जिल्हाप्रमुख शिंदे गटात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. खांबेकर यांच्यासोबत मराठवाड्यातील मनसेच्या आणखी तीन जिल्हाध्यक्षांनीही शिंदे गटाची वाट धरल्याने […]

मराठी मतांची एकजूट; जळगावात राज–उद्धव युतीचा शक्तीप्रदर्शनाचा संदेश

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर जळगावच्या राजकारणातही त्याचे पडसाद उमटले आहेत. या ऐतिहासिक युतीच्या स्वागतासाठी जळगावात दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. राज–उद्धव युतीची घोषणा होताच जळगावातील आकाशवाणी चौकातील छत्रपती […]

नगराध्यक्षांना मताधिकार; नगरपरिषदा कायद्यात मोठी सुधारणा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व देण्यासह मताचाही अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमताचा प्रश्न उद्धवला तर नगराध्यक्षांना आपले मत योग्य त्या पक्षाच्या पारड्यात टाकून प्रकरण निकाली काढता येणार आहे. हा बदल सत्ताधाऱ्यांना अनुकूल असल्याचा दावा केला जात आहे. […]

ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांची खिल्ली; महायुतीवर परिणाम नाही, ठाम दावा

मुंबई : वृत्तसंस्था  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर जोरदार टीका करत खिल्ली उडवली आहे. ठाकरे बंधूंची युती ही कोणतीही राजकीय क्रांती नसून, केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आल्याचा दावा फडणवीस यांनी केला. फडणवीस म्हणाले, “काही प्रसारमाध्यमे असे चित्र उभे करत आहेत […]

मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची ताकद एकवटली

मुंबई वृत्तसंस्था  मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत युती जाहीर करत बीएमसी निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. यावेळी ठाकरे बंधूंनी प्रतिस्पर्ध्यांच्या राजकीय खात्म्याचा निर्धार व्यक्त […]

१७ लाखांच्या लाचप्रकरणी सीजीएसटी अधीक्षक अटकेत

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबईतील सीजीएसटी (केंद्रीय वस्तू व सेवा कर) कार्यालयातील एका अधीक्षकाला खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाच स्वीकारताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रंगेहाथ अटक केली आहे. संबंधित प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने तब्बल १७ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने ही कारवाई केली. या प्रकरणाची […]

महापालिका रणधुमाळी : अरे बापरे.. पहिल्याच दिवशी ७७७ अर्जांची विक्री

जळगाव – प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला आज सुरुवात झाली असून सकाळपासूनच महापालिकेच्या इमारतीत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. नामनिर्देशन अर्ज घेण्यासाठी इच्छुकांनी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी सहा निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रभागनिहाय तब्बल ७७७ अर्जांची विक्री झाली. निवडणुक प्रक्रियेला मंगळवारी (दि. २३) सुरुवात झाल्याने उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळी दहा […]

नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण तापले : ‘हिरवे साप, गोलटोपी’ उल्लेखामुळे निवडणुकीत नवा वाद !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्ष प्रचारात आक्रमक झाले आहेत. अशातच मिरा-भाईंदर येथे भाजपचे आक्रमक नेते व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या विधानामुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिरा-भाईंदर येथे […]

विवाहितेचे फिनाइल प्राशन : चौघाविरोधात गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी विवाहिता सासरी असताना तिच्या माहेरी तलाकची नोटीस पाठविल्याने विवाहितेने फिनाइल प्राशन केले. हा प्रकार २२ डिसेंबर रोजी मास्टर कॉलनीमध्ये घडला. याप्रकरणी पती, सासू, सासरे, नणंदेविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिच्या पतीने भुसावळ येथे माहेरी तलाकची नोटीस पाठविल्याचे तिला तिच्या आईने फोन करून […]

आज एखादी वयस्कर व्यक्ती किंवा वरिष्ठ व्यक्ती अभ्यासपूर्ण सल्ला देऊ शकते.

आजचे राशिभविष्य दि.२४ डिसेंबर २०२५ मेष राशी लवचिक वर्तन ठेवा आणि इतरांचे बोलणं समजून घेण्यास तयार रहा. आज एखादी वयस्कर व्यक्ती किंवा वरिष्ठ व्यक्ती अभ्यासपूर्ण सल्ला देऊ शकते. वृषभ राशी आज तुम्हाला व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. एखादा सहकारी तुम्हाला ऑफिसचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यास मदत करेल. मिथुन राशी आज, तुमचे काम पूर्ण झाल्यावर तुम्ही […]

error: Content is protected !!