नाशिक भाजपमध्ये ‘इनकमिंग’चा धडाका; पक्षप्रवेशांमुळे अंतर्गत वाद उफाळले

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाशिकमध्ये आज भाजपने मोठा ‘इनकमिंग’ कार्यक्रम आयोजित करत विरोधी पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांना पक्षात सामील करून घेतले. मात्र, या पक्षप्रवेशांनी भाजपची ताकद वाढली असली तरी त्याचवेळी नाशिक भाजपमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या […]
“रोज नई सुबह है… माझं पोट खूप मोठं आहे” : जगतापांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया !

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पुण्यात मोठा धक्का देणाऱ्या प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या एका विधानाने चर्चेला वेग आला आहे. “प्रशांत जगताप यांना मनापासून शुभेच्छा. रोज नई सुबह है… माझं पोट खूप मोठं आहे,” असे म्हणत सुळेंनी केवळ प्रतिक्रिया दिली नाही, तर पक्षातील नाराजी, […]
“धर्मावर मत देता, पण धर्मांतर करणार आहात का?” – प्रकाश आंबेडकरांचा मतदारांना थेट सवाल

मुंबई : वृत्तसंस्था देशातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर परखड भाष्य करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट मतदारांनाच आरसा दाखवला आहे. “जे लोक फक्त धर्म पाहून मतदान करतात, त्यांना माझा एकच प्रश्न आहे – तुम्ही किंवा तुमचे कुटुंब भविष्यात धर्मांतर करणार आहात का? जर करणार नसाल, तर मग आरएसएस आणि भाजप धर्माचा […]
नांदेड हादरले : एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबातील 2 मुलांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तर त्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह घरातच झोपलेल्या स्थितीत आढळले. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ माजली असून, ही घटना आत्महत्या आहे की घातपात? याविषयी उलटसूलट चर्चा रंगली आहे. यासंबंधीच्या […]
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीचे नवे उच्चांक!

मुंबई : वृत्तसंस्था उत्तर महाराष्ट्राचे मानबिंदू आणि ‘सुवर्णनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. अवघ्या चार दिवसांत सोन्याच्या दरात प्रति तोळा ३,२०० रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरात तब्बल १७ हजार रुपयांची उसळी नोंदविण्यात आली आहे. परिणामी चांदीचा दर प्रति किलो २ लाख २२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. […]
जळगाव महापालिका रणधुमाळी : भाजप-शिंदे सेना यांची महायुती ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी होणार चर्चा..!

जळगाव : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत महायुतीचा निर्णय घेतला आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत या युतीची रूपरेषा आखण्यात आली. बैठकीला पालकमंत्री व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, भाजपचे शहराध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विष्णू भंगाळे, […]
किन्ही रस्त्यावर काळाचा घाला; ट्रॅक्टर उलटून बाप-लेक जागीच ठार

भुसावळ : प्रतिनिधी वरणगाव–विल्हाळे–किन्ही रस्त्यावर बुधवारी (दि. २४) दुपारी झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघाताने संपूर्ण वरणगाव शहराला धक्का बसला आहे. ट्रॅक्टर उलटून झालेल्या या दुर्घटनेत चालक वडील आणि त्यांचा सात वर्षीय चिमुकला मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मजूर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे सिद्धेश्वर नगरसह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली […]
शहर हादरवणाऱ्या ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील शाहू नगर परिसरात झालेल्या एमडी ड्रग्स कारवाईचे धागेदोरे मास्टर कॉलनीतील शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तो पसार झाला होता. दुबई पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच, मालेगाव येथे ड्रग्सची विक्री करताना अबरार जिलानी याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक कारागृहातून त्याला […]
चाळीसगाव गोळीबार प्रकरणी पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात !

चाळीसगाव : प्रतिनिधी रेल्वे स्टेशन परिसरात एकावर गोळीबार केल्याप्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या दोघांनी ज्यांच्याकडून हे गावठी कट्टे घेतले त्याच्या घरावरही पोलिसांनी छापा टाकला असता घरात १ गावठी कट्टा व २ राऊंड मिळून आले. दोन घटनात पोलिसांनी ३ गावठी कट्टे (पिस्तुल) व ६ […]
तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा पाठिंबा मिळेल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल.

आजचे राशिभविष्य दि.२५ डिसेंबर २०२५ मेष राशी आज नवीन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न करताना काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील एखाद्याला आरोग्य समस्या येऊ शकतात. वृषभ राशी आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असेल. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या सहयोगी जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता. मिथुन राशी आजचा दिवस आनंदाच्या बातम्यांनी […]