जळगाव महापालिका निवडणुकीत ५३.५९ टक्के मतदान; शेवटच्या तासांत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव – जळगाव महापालिका निवडणुकीत गुरुवारी एकूण ५३.५९ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी मतदानाची गती मंदावलेली असताना शेवटच्या दोन तासांत मतदारांनी मोठ्या संख्येने केंद्रावर हजेरी लावली. या कालावधीत तब्बल १९ टक्के मतदान झाले. त्यामुळे दिवसभरातील एकूण मतदानाचा टक्का २०१८ च्या तुलनेत दोन टक्क्यांनी घटलेला दिसून आला. किरकोळ वादविवाद वगळता संपूर्ण शहरात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार […]
“मतदान हा लोकशाहीचा उत्सव – जळगावकरांनी सक्षम उमेदवारासाठी मत नोंदवा”

जळगाव – शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा हक्क, आणि नागरिकांनी आपल्या प्रभागातील सक्षम उमेदवार निवडण्यासाठी हा हक्क बजावणे अत्यावश्यक आहे. महापालिकेने मतदारांना आवाहन केले आहे की, प्रत्येकाने मतदान करून लोकशाही मजबूत करावी. मतदार जनजागृतीसाठी विशेष हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून वॉर्डनिहाय मतदान केंद्र शोधण्यासाठी […]
प्रभाग ५ मधील बोगस व दुबार मतदारांवर कारवाई अटळ – ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांचा इशारा

जळगाव: निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी, प्रभाग क्रमांक ५ मधील सर्व बोगस आणि दुबार नोंदणी असलेल्या मतदारांवर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उमेदवार ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नेमके प्रकरण काय? नुकतीच निवडणूक मतदार […]