कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

जळगाव : प्रतिनिधी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन कंजरभाट समाज समाजमंदिर येथे उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. नथ्थु रायचंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना देत *“भारत माता की जय” व “वंदे मातरम्” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला तर महाराष्ट्र गीताने […]
जिल्हा परिषद निवडणुकीत खळबळ; काँग्रेसच्या महिला उमेदवाराचे अपहरण, भाजपवर गंभीर आरोप !

लातूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत धक्कादायक घटना घडली असून, काँग्रेसच्या एका महिला उमेदवाराचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असतानाच ही घटना घडल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे. […]
भुसावळ तालुक्यातील साकरी गावात दोन शाळकरी अल्पवयीन मुलींच्या क्रूर हत्येने मोठी खळबळ

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात एका विहिरीत दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून,साकरी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन्ही मुली शाळेत शिक्षण घेत होत्या आणि गावातीलच रहिवासी होत्या. आज सकाळी शाळेत जाण्याच्या वेळी […]
बाबासाहेबांच्या उल्लेखावरून रणकंदन; वडेट्टीवारांचा गिरीश महाजनांवर घणाघाती हल्लाबोल

नाशिक : वृत्तसंस्था नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने राज्यभरात तीव्र राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गिरीश महाजन आणि सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या कार्यक्रमादरम्यान भाषण सुरू असतानाच […]
महिला व बाल विकास विभागातील कर्मचाऱ्यांचा असंतोष उफाळला; प्रलंबित मागण्यांसाठी पालकमंत्री पाटलांना निवेदन !

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याने विभागात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना, पुणे व संलग्न क्षेत्रीय कर्मचारी संघटनांनी शासनाला पूर्वसूचना देत सनदशीर आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी […]
भीषण अपघात; स्विफ्ट कार पलटी होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू

मुंबई : वृत्तसंस्था ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील कोळमाथा येथे नंदलाल लॉन्ससमोर स्विफ्ट कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (दि. २७) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. वरद एकनाथ तांबे (रा. ओतूर) आणि करण पवळे (रा. पिरंगुट) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या […]
जळगावचा ‘पॅटर्न’ राज्यासाठी आदर्श; पाणीपुरवठा विभाग थेट तिसऱ्या क्रमांकावर

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग राज्यात तिसरा जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन व क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांच्या संयुक्त मूल्यमापनातून राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यातील तब्बल 57 मंत्रालयीन विभागांपैकी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने थेट तिसरा क्रमांक पटकावत 200 पैकी 170.50 गुण मिळवले आहेत. हा विभाग जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व […]
सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून विवाहितांनी आयुष्य संपविल्याच्या घटना घडत असताना आता पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी येथे सासरच्या छळाला कंटाळून एका इंजिनिअर विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीप्ती मगर चौधरी असे मृत विवाहितेचे नाव असून तिने काल रात्री गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष […]
तुमच्या नात्यात सकारात्मक भावना निर्माण होतील. कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

आजचे राशिभविष्य दि. २७ जानेवारी २०२६ मेष राशी व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या पालकांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. कौटुंबिक संबंधही सुसंवादी राहतील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. वृषभ राशी तुमची आर्थिक परिस्थिती बरीच मजबूत असेल. पर्यटनाशी संबंधित लोकांना आर्थिक फायदा होईल. तुम्हाला उत्साही वाटेल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध […]