प्राजक्ता माळीची खास पोस्ट; अंकुश चौधरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : वृत्तसंस्था मराठी चित्रपटसृष्टीतील ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अंकुश चौधरी यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेही खास पोस्ट शेअर करत अंकुशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी सध्या त्यांच्या नवीन […]
दिल्ली दौऱ्याआधी शरद पवारांचे सूचक विधान; राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडींचे संकेत

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सूचक वक्तव्यामुळे नवे परिमाण मिळाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या […]
महायुतीची ताकद पुन्हा सिद्ध : जळगाव मनपाचे महापौर-उपमहापौर निश्चित

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौर व उपमहापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महायुतीकडून आज या दोन्ही प्रतिष्ठेच्या पदांसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली. विरोधी गटाकडून कोणतेही अर्ज दाखल न झाल्याने भाजपाच्या दीपमाला मनोज काळे यांची महापौरपदी, तर शिंदेसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे. भाजपाचे जळगाव […]
मुंबईत तमिळ एकजूट दाखवली; राज ठाकरेंच्या टीकेला सेल्वन यांचा थेट इशारा

मुंबई : वृत्तसंस्था तमिळ भाषिकांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्याविरोधात बोलाल, तर मुंबईत लाखोंचा मोर्चा काढू,” असा स्पष्ट इशारा देत सेल्वन यांनी आपली ताकद दाखवून दिली. सायन-कोळीवाडा परिसरात काल भगवान मुरुगन यांच्या भक्तांचा जनसागर उसळला होता. ‘थैपूसम’ उत्सवानिमित्त आयोजित भव्य ‘पाळकुडम कावडी अट्टम’ रॅलीत […]
‘दाल में कुछ तो काला लगता है’ ; अमोल मिटकरींच्या सवालांना विजय वडेट्टीवारांची दुजोरा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यभरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या विमान दुर्घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करत गंभीर सवाल उपस्थित केल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. “दाल में कुछ तो काला लगता है,” असे […]
कोंडाईबारी घाटात भीषण अपघात; दोन ट्रकांच्या मधोमध बस चिरडली

नंदुरबार : वृत्तसंस्था नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पोलिस चौकीजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला मागून भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने बस समोर उभ्या असलेल्या ट्रक आणि कंटेनरच्या मधोमध अक्षरशः चिरडली गेली. या भीषण अपघातात बसचा पुढील भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाला. अपघात इतका जबरदस्त होता की कंटेनरच्या धडकेत बसची केबिन चेंदामेंदा झाली. ट्रकचा […]
‘खऱ्या आर्थिक संकटांकडे दुर्लक्ष’; राहुल गांधींची सरकारवर घणाघाती टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रमाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या उपक्रमामुळे हातमाग, वस्त्रोद्योग, हस्तकला, विणकर आणि कुटीर उद्योगांना चालना मिळणार असून ग्रामीण भागातील गरीब तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा सरकारचा दावा आहे. भारताकडे क्रीडा-संबंधित उत्पादने विकसित करण्याची मोठी क्षमता असल्याचेही अर्थसंकल्पात नमूद […]
घरी कोणीही नसतांना प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी कुटुंबीय गावातील यात्रेत गेलेले असताना घरी कोणीही नसतांना भिकन किसन पाटील (वय ५५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. प्रौढाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ममुराबाद येथे भिकन पाटील हे वास्तव्यास होते. त्यांच्या गावात […]
मध्यरात्री भीषण आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील कसाली मोहल्ल्यात दिनांक ३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप गंभीर असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आणि स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी […]
तरुणांनी निरुपयोगी कामांमध्ये आपला वेळ वाया घालवणे टाळावे. आरोग्य आणि मनोबल सुधारण्यासाठी देखील थोडा वेळ घालवा.

आजचे राशिभविष्य दि. २ फेब्रुवारी २०२६ मेष राशी महत्वाच्या समस्येवर उपाय मिळेल. आज इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळल्याने तुमची कामगिरी सुधारेल. तुमच्या आवडत्या कामांना प्राधान्य दिल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. वृषभ राशी तुमच्या मुलांचं यश तुम्हाला आनंद देईल. जर तुम्ही शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर सर्व काही ठीक होईल. आज तुम्ही जे काही हाती […]