September 27, 2026 1:53 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

अजित पवारांचा मृत्यू स्वीकारणं कठीण; रोहित पवारांनी मांडले अपघाताचे प्रश्न

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून, या अपघातावर शंका उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली. “अजितदादांचा मृत्यू झाला, यावर विश्वास बसत नव्हता. आज दादा आपल्यात नसले तरी विचाराने ते कायम आपल्या सोबत आहेत,” असे भावनिक शब्दांत त्यांनी सांगितले. […]

कागदोपत्री नव्हे, प्रत्यक्ष उपाययोजना; शेतकरी आत्महत्यांवर कृषी विभागाचा ठोस आराखडा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी आत्महत्या ही गंभीर सामाजिक समस्या लक्षात घेऊन कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याची घोषणा कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे केली आहे. अशा प्रकारचे कृती दल स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासोबतच सामाजिक, […]

भागवतांच्या कार्यक्रमावर राज ठाकरेंची टीका, नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंनाही डिवचले

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या व्याख्यानमालेदरम्यान संघप्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या भाषिक वादावरील वक्तव्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले असून, त्यांनी सोशल मीडियावरून तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे यांनी पोस्टद्वारे, “मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, […]

मुलांच्या भविष्यासाठी गोविंदाची राजकारणातून एक्झिट

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतानाच त्याने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि कुटुंबाला अधिक वेळ देण्यासाठी गोविंदाने राजकारणातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एका नामांकित वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने ही माहिती स्पष्ट शब्दांत दिली. गोविंदाने सांगितले की, मुलगा यशवर्धन आहुजा आणि मुलगी […]

अजित पवारांच्या शेवटच्या पाठपुराव्याला मान्यता; कॅबिनेटने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत त्यांनी पाठपुरावा केलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. आज (दि. १० फेब्रुवारी) मुंबई येथे कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर […]

महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार !

मुंबई : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज प्रथमच मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्रीपदाचा विधिवत कार्यभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी ही जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या मंत्रालयातील आगमनावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मंत्र्यांनी जोरदार स्वागत केले. कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयातील दादांच्या केबिनमध्ये प्रतिमेला अभिवादन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या. यावेळी पार्थ पवारही […]

मुख्यमंत्री फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा; सुनेत्रा पवारांची पाठोपाठ दिल्लीवारी

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (९ फेब्रुवारी) रात्री अचानक दिल्ली गाठून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आणि आज पहाटेच ते मुंबईत परतले. या गोपनीय आणि अल्पकालीन दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता […]

घराशेजारील मंडप ठरला मृत्यूचा साक्षीदार; तरुणाची आत्महत्या

जळगाव : प्रतिनिधी घराशेजारी कार्यक्रम असल्यामुळे मंडप टाकलेला होता. त्या मंडपाच्या दोरीला गळफास घेत रियाज जोहबा तडवी (वय १९, मूळ रा. लोहारा, ता. रावेर, ह. मु. सुप्रिम कॉलनी) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  रावेर तालुक्यातील लोहारा […]

पोलिस भरतीला ११ फेब्रुवारीपासून सुरुवात; ३८ व्हिडिओग्राफर, मोबाईलवर बंदी !

जळगाव : प्रतिनिधी पोलिस शिपाई पदाच्या १७१ जागांसाठी सुमारे १२ हजार उमेदवारांनी अर्ज भरले आहे. दि. ११ फेब्रुवारीपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीला सुरूवात होत आहे. त्याकरीता पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले असून भरती प्रक्रियेमध्ये ज्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पाल्य अथवा नातेवाईक आहे, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. […]

या राशीच्या व्यावसायिकांना आज आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे.

आजचे राशिभविष्य दि.१० फेब्रुवारी २०२६ मेष राशी लोकांवर अधिकार गाजवण्याच्या तुमच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवा; त्याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. या राशीच्या लोकांना आज जवळच्या व्यक्तीकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या करिअरच्या बाबतीत, तुमच्यावर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्यांचा भार पडू शकतो. कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमच्या प्रेम जोडीदारासाठी आजचा दिवस खूप छान असेल. जोडीदाराचे […]

error: Content is protected !!