September 20, 2026 3:37 pm

कात्रजमध्ये थरारक अपघात : भरधाव डंपरची ५ वाहनांना धडक; बोगद्याजवळ पेट घेऊन जळून खाक !

पुणे : वृत्तसंस्था पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज येथील जांभुळवाडी बोगदाजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील डंपरने समोरील चार ते पाच वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. धडकेनंतर काही क्षणांतच डंपरने अचानक पेट घेतल्याने तो पूर्णपणे जळून खाक झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अनियंत्रित डंपरने […]

१० वी नंतर थांबू नका; हे कोर्स देतील थेट नोकरीची हमी!

१० वीची बोर्ड परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकच प्रश्न असतो — आता पुढे काय? सर्वच विद्यार्थ्यांना दीर्घकालीन पदवी अभ्यासक्रम किंवा महागड्या कॉलेजचा खर्च परवडतोच असे नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांच्या करिअरचे दरवाजे बंद होतात. आजच्या स्पर्धात्मक आणि कौशल्याधारित युगात १० वी नंतरही अनेक टेक्निकल आणि प्रोफेशनल कोर्स उपलब्ध […]

नागपूरकर प्रकरण गाजणार? १७ लाखांच्या आरोपांवरून जरांगे पाटील आक्रमक

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक गंभीर प्रकरण उघड झाल्याचा दावा केला. रंजना नागपूरकर या महिलेने केलेल्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या पती प्रदीप नागपूरकर हे पोलिस दलात कार्यरत होते. एका प्रकरणाचा निकाल अनुकूल लावून देण्यासाठी धनंजय मुंडे यांना १७ लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप […]

प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ विक्रम : मराठी चित्रपटासाठी जागतिक मान्यता

मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता प्रसाद ओक यांनी इतिहास रचला आहे. त्यांच्या अभिनयाने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या मराठी चित्रपट ‘धर्मवीर’ साठी मिळवलेल्या १५ पुरस्कारांच्या माध्यमातून एका प्रादेशिक भाषेतील चित्रपटासाठी सर्वाधिक पुरस्कार मिळवणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत त्यांचे नाव इंग्लंडस्थित Global Book of Excellence संस्थेने अधिकृतपणे नोंदवले आहे. हा विक्रम १४ जानेवारी २०२६ रोजी अधिकृतपणे मान्य […]

“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !” पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन जळगाव ; प्रतिनिधी “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण आहेत. शिवरायांचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहे,” छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा, विचारांचा आणि आदर्शांचा गौरव करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी असे […]

शिवरायांच्या जन्मोत्सवी सोहळ्यात शासनाची किल्ले संवर्धनाची ठाम भूमिका ; मुख्यमंत्री !

जुन्नर : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जन्मोत्सवानिमित्त शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला येथे भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्याच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला. शिवजन्मभूमीवरून बोलताना फडणवीस यांनी इतिहास, स्वराज्य आणि किल्ल्यांच्या जतनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास […]

नेरी नाका परिसरात अज्ञात हल्लेखोरांचा रिक्षाचालकावर धारदार चॉपरने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील नेरी नाका परिसरात पॅजो रिक्षाचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून तिघा अज्ञात हल्लेखोरांनी रिक्षाचालकावर धारदार चॉपरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना १६ तारखेला सायंकाळी आठ वाजता घडली. या हल्ल्यात मुन्ना रमजान पिंजारी (वय ३६, रा. बिलाल चौक, तांबापुरा) गंभीर जखमी झाले असून त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

चॉपरचा धाक लुटले अन नंतर केली फायटरने मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी दारू पिण्यास पैसे न दिल्याने अमजद खान अमीर खान (वय ३६, रा. लक्ष्मीनगर) यांना चॉपरचा धाक दाखवून गळ्यातील चांदीची चेन आणि खिशातून १ हजार २८० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर फायटरने डोक्यात मारून दुखापत केली. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी जुने बस स्थानकामागे घडली. याप्रकरणी तनवीर उर्फ तन्या शेख (२०, रा. गेंदालाल […]

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त राज्यभर जल्लोष

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पहाटेपासूनच विविध ठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिषेक सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त ऐतिहासिक शिवनेरी किल्ला येथे भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांनी शिवनेरी गडावर उपस्थित राहून […]

तुम्हाला चांगले आरोग्य देखील आज मिळेल. तसेच तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल.

आजचे राशिभविष्य दि. १९ फेब्रुवारी २०२६ मेष – आजच्या दिवशी तुमची आर्थिक नाहीत अतिशय उत्तम असेल. तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सर्वजण तुमचा आदर करतील. तुमचे पद प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ याकाळात मिळेल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. तसेच कुटुंबातील लोकांसोबत तुमचे संबंध मधुर होतील. वृषभ : आज तुम्ही व्यवसायात प्रसिद्ध व्हाल. तुमची […]

error: Content is protected !!