२० मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद; नागरिकांनी अत्यावश्यक औषधांचा साठा करून ठेवावा – अन्न व औषध प्रशासन
जळगाव, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) – अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. २० मे २०२६ रोजी देशभरातील ठोक व किरकोळ औषध विक्री व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अनेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यावश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन…