चाळीसगावात एसीबीची धडक कारवाई! उपविभागीय अभियंता आणि सहायक ७ हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद
चाळीसगाव | प्रतिनिधी: चाळीसगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत उपविभागीय अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कुलदीप विरूचंद गमे यांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या…