पाळधी-तरसोद बायपासवर पुन्हा भीषण अपघात! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांची मालिका सुरूच असून, पाळधी रेल्वे पुलावर आयशर मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार योगेश गजमल राक्षे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या योगेश यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश राक्षे हे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करत […]