जळगावच्या तीन पैलवानांची आंतरराष्ट्रीय भरारी! राजू मामा भोळे यांच्या सहकार्याने आशियाई चॅम्पियनशिपची संधी

जळगाव प्रतिनिधी: जळगावच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. उत्तराखंड येथे झालेल्या ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जळगावच्या तीन पैलवानांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. पैलवान हितांशू राजपूत, भूषण हटकर आणि शरद हटकर अशी या खेळाडूंची नावे आहेत. २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान उत्तराखंड येथे आयोजित ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये या तिन्ही खेळाडूंनी […]