जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हापेठ पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हापेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली. आरोपींकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस तपासात आरोपींनी मोटारसायकल चोरी करून ती विक्री करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने केली आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


